Advertisement

Responsive Advertisement

मुख्यमंत्र्यांवर बोलला तर थोबाड लाल करू -चंद्रकांत खैरे


औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभेवेळी.  शिवसेना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या  यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. “मुख्यमंत्र्यांविषयी बोलाल तर थोबाड लाल करू”, असा त्यांनी इशारा दिला आहे.आज औरंगाबादच्या सभेत चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे. “कुणीही उठतं मुख्यमंत्र्यांबाबत बोलतं. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंबद्दल बोलतात. आम्ही सहन करणार नाही. फालतू शक्ती कपूर- किरीट सोमय्या उठसूठ मुख्यमंत्र्यांबाबत बोलतो. इथून पुढे जर शिवसेनेबाबत, मुख्यमंत्र्यांबाबत अवाक्षर काढलं तर आम्ही त्याचं थोबाड लाल केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांबद्दल अरे-तुरे बोलतो. त्याला म्हणावं संभाजीनगरला ये… तुला दाखवतो…”, असं खैरे यांनी म्हटलंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या