Advertisement

Responsive Advertisement

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सचिवपदी पंडित पा.जाधव यांची निवड

धर्माबाद- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांच्या व गोर गरीब जनतेच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी पंडीत पाटील जाधव हे नेहमी प्रयत्नशील असतात.त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वरीष्ठांनी व जिल्हा अध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांनी घेतली आहे. व पंडीत पाटील जाधव यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सचिव पदी निवड केल्याचे एका नियुक्ती पत्राद्वारे जाहिर केले आहे.

 पंडीत पाटील जाधव हे बिलोली तालुक्यातील कामरसपल्ली  येथील रहिवासी आहेत.परंतु गेल्या अनेक वर्षांपासून धर्माबाद शहरात ते स्थायिक झाले आहेत. व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी युवकांच्या व गोर गरीब जनतेच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्यामुळे त्यांची नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांत चांगलीच ओळख निर्माण झाली आहे. व जाधव यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी घेतली असून आता जाधव यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सचिव पदाची जबाबदारी दिल्यामुळे धर्माबाद तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड येथील आयोजित कार्यक्रमात सदरील नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर,माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, भगवानराव पाटील आलेगावकर,निशांत वाघमारे,युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वंसत सुगावे,युवा नेते शिरिष भाऊ गोरठेकर, नांदेड ग्रामीणचे पक्षनिरीक्षक आशाताई भिसे,सौ.कल्पनाताई डोंगळीकर,युवक कार्याध्यक्ष संभाजी मुकनर यांच्या उपस्थितीत पंडीत पाटील जाधव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या