Advertisement

Responsive Advertisement

' ना क्वालिटी ना कंट्रोल ' असोला येथील नळकांडी पुलाचे काम बोगस ,चौकशी करून कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी

ज्ञानेश्वर रोकडे/जिंतूर 
              तालुक्यातील असोला येथील नव्याने करण्यात आलेल्या नळकांडी पुलाचे काम अत्यंत निकृष्ठ करण्यात आले असून सदरील कामाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी यांच्याकडे निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.
                 याबाबत दिलेल्या निवेदन नमूद करण्यात आले आहे की,मौ.असोला येथील रस्त्यावर जिल्हा परिषद अंतर्गत दोन सिडी वर्क नळकाडी पुलाचे बांधकाम झाले आहे सदरील बांधकाम मध्ये सिमेंट कॉक्रेट न वापरता त्यामध्ये दगडाचा व मुरुमाचा वापर बेसुमार केला आहे. त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून काम चालू असतांना ग्रामस्थांनी कंत्रादारास  याची विचारणा केली तर उलट कंत्राटदाराने तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही असेच काम करणार त्यानंतर संबंधीत कामाचे शाखा अभियंता याना फोनवर बोगस कामाची कल्पना दिली असता त्यानी त्याकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारास बोगस दगडाचे व मुरूमाची भर घातलेल्या नळकांडी पुलाचे काम पूर्ण करून घेतले,त्यामुळे गुणवत्ता तपासणी विभागाकडून तपासणी करावी व संबंधीत कंत्राटदारावर कार्यवाही करावी अन्यथा  जि.प.समोर  उपोषणास बसणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे या निवेदनार जगनाथ दराडे यांची स्वाक्षरी आहे.

[ जिंतूर तालुक्यात अनेक गावांमध्ये जिल्हा परिषद विभागाकडून पुलांची करण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा  कंट्रोल नसल्याने या कामाची क्वाॅलिटी ढासळली  आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्हा परिषद कडून करण्यात येणाऱ्या कामांची ' ना क्वालिटी ना कुणाचा कंट्रोल ' अशीच परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे.]


[ *शाखा आभियंत्याचे हात ओले* 
              सदरील पुलाच्या कामांमध्ये मोठ्याप्रमाणावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून गुत्तेदार पोसण्याचे काम शाखा अभियंता यांनी केले असल्यामुळे या कामांमध्ये शाखा अभियंत्याचे हि हात ओले झाल्याचे कामाच्या गुणवत्ता पाहिल्यावर उघड दिसत आहे. त्यामुळे संबंधित शाखा अभियंत्याच्या कार्यक्षेत्रात झालेल्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे.]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या