Advertisement

Responsive Advertisement

सायखेड गावात पिसाळलेल्या कुत्र्याने आठ महिलांना घेतला चावा...

धर्माबाद:- धर्माबाद तालुक्यातील सायखेड गावात पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवसांत   आठ महिलांना चावा घेतला आहे. जखमींना धर्माबाद येथील ग्रामीण  रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ अरविंद फिसके साहेब यांनी तपासणी करून रुग्णांना लस देण्यात आली. तर, पाच जनांना करखेली येथील उपकेंद्रात उपचार सुरू आहेत.
सायखेड गावात गेल्या काही दिवसांपासून  मोकाट कुत्रे जखमी अवस्थेत फिरत आहे. या पूर्वी दोन ते तीन तरुणांना या कुत्र्याने चावा घेतला.  दोन दिवसांत या कुत्र्याने गावातील आठ जणांना चावा घेतला आहे. ग्रामीण रग्णालयात कुत्र्याने चावा घेतल्यास रेबीज न होण्यासाठी दिली जाणारी 'रॅबीपूर' ही लस उपलब्ध आहे. मात्र, पिसाळलेले कुत्रे चावल्यास 'इमिनो ग्लोबलिंग' ही लस घ्यावी लागते. ही ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नसल्याने चावा घेतलेल्या सर्व जखमींना नांदेड येथील विष्णुपुरी येथील  सरकारी रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले.रुग्णाचे नावे  विमलबाई जाधव,अनीता मुकडे, साक्षी मरेवार, लता यडजेवार, संगीता लोलापोड, रुक्‍मीनबाई बंटेवाड, अंजनबाई बोडके, अनुसयाबाई हानमोड,पिसाळलेल्या कुत्र्याने दोन ते तीन ठिकाणी चावा घेतला आहे.आरोग्य विभागाने या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाल्याने सध्या या पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांनी धसका घेतला आहे. ग्रामपंचायत पंचायत समितीने या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रुग्णालयातील सर्व रुग्णांना  कुलकर्णी सिस्टर, सुजाता दवणे सिस्टर,किनेवाड सिस्टर,प्रकाश कांबळे, बाबुराव चिगळे
अमजद भाई यांनी रुग्णांना सेवा देत अथीक परिश्रम घेतले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या