Advertisement

Responsive Advertisement

वृक्ष संगोपन संवर्धनाची चळवळ जनमाणसापर्यंत रुजावी -शांताराम मगरवाढदिवसाचा खर्च टाळून तरुणांनी वृक्ष लागवड केली....! 

वृक्ष लागवड करुण वाढदिवस साजरे करण्याचा तलवाडा येथील तरुणांचा संकल्प...!. 

वैजापूर-

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे "या उक्तीप्रमाणे वृक्षच मानवाच्या जीवनामध्ये आनंद देऊ शकतात .त्यामुळे तरुणांनी वाढदिवसानिमित्त वृक्षलागवड करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतलाआहे. त्यामुळे वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला आळा बसेल व जीवनात आपण काहीतरी समाज उपयोगी कार्य या निमित्ताने करू शकतो म्हणून मी हा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने वृक्ष लागवड करत साजरा केला आहे. तालुक्यातील तलवाडा येथील तरुण- युवकांनी अशाच प्रकारचा वाढदिवस साजरा करावा.
वाढदिवस म्हटले की बॅनर, पोस्टर लावण्याची परंपरा गेल्या काही वर्षात सर्वत्र दिसून येते, मात्र या परंपरेला फाटा देत समाजोपयोगी आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे हा उद्दात हेतू समोर ठेवून पर्यावरणाचे संतुलन आणि समतोल कायम राखण्यासाठी व वृक्ष संगोपणाची चळवळ जनमाणसापर्यंत रुजावी या हेतूने  

  वैजापुर तालुक्यातील तलवाडा येथील मंदिर,शाळा,स्मशानभुमीपरिसरामध्ये शांताराम मगर यांच्या वाढदिवसानिमित्त वटवृक्ष लागवड करण्यात आले  यावेळी कृ,उ,बा,समिती सभापती भागीनाथ मगर,ग्रामसेवक आर,आर,पवार,शावलालाल मगर,
शिवाजी,मगर,रामभाऊ मगर,कचरु मगर,संतोष सुर्यवंशी राजेद्र मगर,केशव मगर,ज्ञानेश्वर मगर,लक्ष्मण मगर,दत्तु मगर,
रामदास मगर,काकासाहेब पवार,प्रकाश सोनवणे,यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना शांताराम मगर  म्हाणाले दिर्घायुष्याकरीता नैसर्गिक आरोग्यवर्धक गुणधर्म अंतर्भुत असलेलेे वृक्ष मानवाला प्राणवायु, फळं, फुलं, सावलीच देत नाहीत तर अंतिम क्षणातही त्याला साथ देतात. ही जाणीव अंगी बाळगून त्याने पर्यावरणास घातक ठरणार्‍या घटकांचे पतन करुन वृक्षांचे रक्षण केले पाहीजे. संपूर्ण तलवाडा गावात तरुण वर्ग ग्रामपंचायतीच्या वि,वि,का, सोसायटीतच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्याकरीता सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे.पर्जन्यमानासाठी व पारिस्थितीकी संतुलनासाठी दृष्टिने  निश्‍चितच उपयुक्त असल्यामुळे ग्रामीण भागाच्या सौदर्यात सुध्दा भर पडेल. नागरीकांनी वृक्षांना आपल्या अपत्याप्रमाणे समजून संगोपन केल्यास शुध्द प्राणवायु मिळेल तसेच आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.
परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यावसायिक,राजकीय जाहीरतीबाजीच्या फलकांमुळे सजीव वृक्षांनाच मोकळा श्‍वास घेणे कठीण झालेले दिसते. त्याकरीता बहूतांश ठिकाणी वृक्षांवर लावलेले फलक शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्वरीत हटविण्यात येवून वृक्षांचे होणारे विद्रुपीकरण थांबवावे, रस्ता रुंदीकरणाच्या पट्ट्यातील वृक्षतोड हा विकासात्मक भाग असला तरी त्या वृक्षकत्तलीच्या जागी नवीन वृक्ष लागवड करुण त्याच्या संगोपनाची अंमलबजावणी झाली पाहीजेत. कृतीनंतरही उल्लंघन करणारांवर योग्य ती कार्यवाही करावी असे शांताराम मगर म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या