Advertisement

Responsive Advertisement

एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांवर जादूटोणा केला', चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा


वैजापूर-  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, शिंदे यांच्याबद्दल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अजब दावा केला आहे. 'एकनाथ शिंदेंना जादूटोणा येतो, त्यांनी आमदारांवर जादू केली', असे अजब विधान खैरे यांनी केले आहे. वैजापूर येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.एकनाथ शिंदेंसोबत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व आमदार गेले आहेत. यात वैजापूर तालुक्याचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांच्या मतदारसंघात आज शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत खैरेंनी शिंदेंवर निशाणा साधताना म्हणाले, 'त्या गुवाहाटीत आमदारांना बेकार करून ठेवलंय. त्यांच्यावर जादूटोणा करण्यात आलाय. कारण, एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात. त्यांच्या तोंडामध्ये सतत एक कोणतीतरी पांढरी गोळी असते. म्हणून त्यांनी जादूटोणा करून या लोकांना आपलं करुन घेतलंय', असा अजब दावा खैरे यांनी केला. जिल्ह्यातील आमदारांच्या बंडखोरीचे सूत्रधार आ. संजय शिरसाट असून त्यांनीच पाच आमदारांची बंडखोरीसाठी ‘मोट’ बांधल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घरगुती कामांसह दिवाळीला भेटवस्तू देत मतदारसंघातील कामांना कोट्यवधींचा निधी देऊन आमदारांना आपलेसे केल्याचेही खैरेंनी नमूद केले. 

राज्यामध्ये चालू असलेल्या सद्यस्थितील राजकीय परिस्थिती बघता आज वैजापूर शिवसेना तालुका शाखेच्या वतीने शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सर्व शिवसैनिकांनी आम्ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक व लोकनेते स्व.आर एम वाणी यांच्या शिकवणी नुसार महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  व शिवसेना यांच्या सोबत या आधीही होतो व यानंतरही एकनिष्ठ पणाने राहण्याचा निर्धार केला. 

याप्रसंगी शिवसेना नेते  चंद्रकांत खैर,संपर्कप्रमुख   विनोद घोसाळकर ,जिल्हाप्रमुख तथा आमदार   आंबदास दानवे विभागीय सचिव पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपनगराध्यक्ष साबेरभाई,सभापती अविनाश पा. गलांडे,उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोनगावकर, बाबासाहेब पा जगताप,संतोष कळवणे,अविनाश पाटील,तालुकाप्रमुख सचिन(बंडू)वाणी,सुभाष कानडे,शहरप्रमुख राजू वैद्य,संतोष जेजुरकर,पं.स.सभापती मनाजी पाटील मिसाळ,जि प सदस्य रामहरी(बापू)जाधव,गटनेते तथा नगरसेवक प्रकाश पा चव्हाण,जेष्ठ नेते आसाराम रोठे आबा,मा.तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत,चेअरमन साहेबराव औताडे,संपत छाजेड,,अंकुश पा सुंब,शहर प्रमुख राजेंद्र पाटील साळुंखे,उपसभापती विष्णूभाऊ जेजुरकर,जिल्हा महिला संघटिका सौ प्रतिभाताई जगताप,सौ सुनीताताई आऊलवार,मा.जि प अध्यक्षा सौ लताताई पगारे,उपजिल्हा महिला संघटक सौ सुलभाताई भोपळे,तालुका महिला संघटक सौ वर्षाताई जाधव,शहर महिला संघटक पद्माताई साळुंके,नगरसेवक पारस घाटे,स्वप्नील जेजुरकर, सकाहरी बर्डे,इम्रान कुरेशी,,ज्ञानेश्वर टेके,बिलालसेठ सौदागर,डॉ निलेश भाटिया,प्रीती भोपळे, बबन त्रिभुवन,युवासेना जिल्हा समन्वयक अमीर अली,तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड,शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, सर्व पं.स.सदस्य,बाजार समिती संचालक,सर्व शिवसेना-युवासेना,उपतालुकप्रमुख, उपशहरप्रमुख,विभागप्रमुख,उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी,युवासेना,शिवसेना अंगीकृत सर्व संघटना,सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या