Advertisement

Responsive Advertisement

१००० बीज गोळे पर्यावरणास अर्पण करण्याचा ज्ञानेश्वरी गुरुकुल चा संकल्प पूर्णफुलंब्री-
ज्ञानेश्वरी गुरुकुल २६ जून रोजी आपला ५ व वर्धापन दिन आज अनोख्या पद्धतीने साजरा केला. बीज गोळे मुलांना प्रशिक्षण देऊन मुलांच्या मध्य्पातून बीज गोळे शाळेत गेल्या 2 दिवसात तयार केली. ह्यावेळी काळी माती आणि काम्पोस्त खत एकत्र करून जपानी तंत्रज्ञान जणून घेऊन गुरुकुलातील प्रत्तेक मुलांनी बीज गोळे तयार केली. कडू लिंब, निलगिरी. गुलमोहर, बाभूळ , चिकू , यांसारखी सर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडे बीज गोळ्यांच्या माध्यमातून मुलांनी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तयार केली .

गणोरी परिसरातील वन विभागाच्या आवाक्यातील एक छोटासा डोंगरावर १००० बीज गोळे मुलांनी अर्पण करून आपला पर्यावरणाशी केलेला संकल्प आज वर्धापन दिनाच्या दिवशीच पूर्ण केला. इवली इवली मुल निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपल्या इवल्या इवल्या हातानी जसे यज्ञ कुंडात संकल्पाची तिलांजली द्यावी त्या पद्धतीने शुद्ध अंतकरणाने मुलांनी बीज गोळे पर्यावरणास अर्पण केली . देणार्यांनीदेत जावे, घेणार्यांनी घेत जावे . घेता घेता घेणार्यांनी देणार्याचे हातच घ्यावे . ह्या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वरी गुरुकुल शाळेने निस्वार्थ सेवेने पर्यावरण आपल्याला ज्या भावनेने ऑक्सिजन , पाणी देतो त्याच भावनेने पर्यावरण पूरक असलेली झाडे आज ज्ञानेश्वरी गुरुकुलाने बीज गोळ्याच्या माध्यमातून पर्यावरणाला दिले.

ह्यावेळी नियोजन बद्ध, प्रत्तेक गटात शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांनी रचना करून विशिष्ट अंतर राखून डोंगर विभागात जाऊन १००० बीज गोळे अर्पण केली. हाच संकल्प पूर्ण करून ज्ञानेश्वरी गुरुकुल शाळेने निसर्ग वातावरणात आपला वर्धापन दिन अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात साजरा केला .

आजचा संकल्प पूर्वक ज्ञानेशारी गुरुकुल शाळेचा ५ वा वर्धापन दिन घडून आणण्यात मुख्याध्यापिका वर्ष गायकवाड , उप - मुख्यध्यापिका सौ रुपाली मगरे , शिक्षिका सौ मानिशा कोल्हे , सौ शारदा चव्हान , साक्षी तांदळे सेविका पार्वतीबाई पेह्रकर , श्री धनंजय रोठे पालक भाऊसाहेब उबाळे आदि मांडली उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया

प्रा अक्षय न्यायाधीश ( संचालक : ज्ञानेश्वरी गुरुकुल , गणोरी )

ज्या पद्द्ध्तीने कुटुंबातील प्रत्येक विद्यार्थी हा त्या घराचा उद्याचा एक आधार स्तंभ असतो. त्याच पद्धतीने पर्यावरणातील प्रत्तेक झाड हे पर्यावरण संतुलनाचे अमुल्य योगदान असते. म्हणूनच आम्ही पर्यावरण पूरक ज्ञानेश्वरी गुरुकुल शाळेचा ५ वा वर्धापन  दिन १००० बीज गोळे ह्या जपानी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही मुलांच्या आणि शिक्षकांच्या माध्यमातून बनविली . प्रत्तेक मुलाला घरातील फळांच्या बिया आणि अंगणातील झाडाच्या वेग वेगळ्या बिया वाया न घालवता आपण अनोखा संकल्प करू करू शकतो हि शिकवण दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या