Advertisement

Responsive Advertisement

मोकाट कुत्र्यांचा मोर्चा आता मॉर्निंगवॉक वाल्यांकडे बंदोबस्तासाठी उपाय योजनाच नाही


धर्माबाद- येथील नगरपालिका कार्यकक्षेत असणाऱ्या धर्माबाद शहरासह रत्नाळी व बाळापुर गावातही मोकाट कुत्र्यांचा नुसता हैदोस वाढला असून दिवसागणिक वाढणारी त्यांची संख्या व कुत्र्यांच्या कळपाचे एखाद्या माणसावर आकस्मिक हल्ला यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून आतापर्यंत किमान पाच वेळेस सदरील वृत्त प्रकाशित झाल्यावरही नगरपालिका प्रशासनाकडे कुत्र्याच्या बंदोबस्तासाठी उपाययोजनाच नाही की काय असा प्रश्न उभा राहत आहे.
 रात्रीच्या वेळेस प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरील एका कोपऱ्यावर कुत्र्यांचा कळप हा असतोच! आणि रात्रीच्या वेळेस वाहनधारक व पुरुष किंवा स्त्रिया ट्रेनला उतरून आपल्या घरी पायी चालत जात असताना तर त्यांच्या अंगावर किंवा वाहनावर वस्सकन धावून जाणे ही नित्याचीच बाब होऊन बसली असून आता सकाळच्या प्रहरी सदरील कुत्रे हे आता कळपा कळपाने लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या दिशेने संचार करीत असून मॉर्निंग वाल्यांच्या अंगावरही ते धावून जात आहेत. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या