Advertisement

Responsive Advertisement

सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यावर कारवाई कराशिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा ट्विटरवर जुना फोटो टाकणाऱ्या नितेश राणेवर गुन्हा दाखल करा
औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून ला जबरदस्त सभा झाली. यानंतर काही भाजप पदाधिकारी आणि जळू प्रवृत्तीनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा जुना फोटो व्हायरल केला. यामुळे या सर्व लोकांवर सायबर सेलच्या माध्यमातून कारवाई करा. अशी मागणी शिवसेनेने पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे केली.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा ट्विटरवर जुना फोटो टाकणाऱ्या नितेशराणेवर गुन्हा दाखल करा, आणि ट्विटर आणि सोशल मीडियावर असलेल्या वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनात केली. सदरील फोटोत दिसणारे गणपत खरात यांचे चार महिन्यापूर्वी निधन झाले आहे.त्यामुळे त्यांच्या परिवाराच्या भावना दुखावल्या गेल्या. या फोटोमध्ये असलेले भाविक असून त्यांना मंदिराच्या बांधकामासाठी हातभार लावल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी माध्यमासमोर खुलासा केला होता. त्यामुळे हे गैरकृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी शिवसेनेने केली.
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, ऍड. आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, आनंद तांदूळवाडीकर,अनिल पोलकर, संतोष जेजुरकर, गणू पांडे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, उपशहर प्रमुख संजय बारवाल, माजी नगरसेवक सचिन खैरे, राजू खरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या