Advertisement

Responsive Advertisement

तब्बल आठ वर्षानंतर फरार डॉक्टरला अटक


जिंतूर -
तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट मागील काही वर्षापासून चालू होता यातच २०१४ साली तपासणी दरम्यान बोगस डॉक्टर आढळून आले होते म्हणून तालुक्यातील आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पोलिसात ३० एप्रिल २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आरोपी बोगस डॉक्टर तेव्हापासून फरार होता त्या डॉक्टरला जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांनी तब्बल आठ वर्षानंतर अटक केली आहे त्यामुळे तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा  वर्तुळात धडकी भरली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावात बोगस डॉक्टर नवकुमार मंडल हा गोरगरीब लोकांना मी डॉक्टर असल्याची भासउन औषध उपचार करीत असे याची माहिती त्याकाळी बोगस डॉक्टर विरोधी पथकाला मिळाल्याने त्यांनी अचानकपणे धाड टाकून नवकुमार मंडल विरुद्ध गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून सदर बोगस डॉक्टर फरार होता दरम्यानच्या काळात शिवनी तालुका किनवट या गावात त्या डॉक्टरने आपले बस्तान बसवले व त्याही ठिकाणी त्यांचा बोगसगिरी डॉक्टरकी चा व्यवसाय बिनबोभाट सुरूच होता परंतु बलात्कारासारख्या भयंकर गुन्ह्यामध्ये तो अडकला गेला 
ही माहिती पोलिसांना मिळताच जिंतूर पोलीस ठाण्यात नुकतेच नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक दीपक दंतूलवार यांनी तत्काळ त्याला नांदेड येथील कारागृहात असताना जिंतूर पोलिसांच्या ताब्यात घेतले तूर्त त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील कार्यवाही चालू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान आता पावसाळ्याचा हंगाम येत असतानाच बोगस डॉक्टर लोकांचे सिझन चालू होत असते म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बोगस डॉक्टरांची तपासणी करणे गरजेचे झाले आहे


[ तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकामार्फत ग्रामीण भागातील बोगस डॉक्टर विरोधात धडक कार्यवाही सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश बोराळकर यांनी दिली आहे.]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या