Advertisement

Responsive Advertisement

शरणापूर येथे जि.प.शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना.


औरंगाबाद- पडेगाव ,शरणापूर येथिल जि.प.प्राशालेत दिनांक 20.6.2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शरणापुर येथे मुख्याध्यापक श्रीमती बनकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली शालेय समिती निवड बैठक पार पडली यात सर्व पालकांमधून सर्वानुमते मतदान पद्धतीने  शालेय व्यवस्थापन समिती  स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्ष पदासाठी सविताबाई गुलाबराव हिवर्डे. व नंदू निळे हे दोघांत निवडणूक घेण्यात आली  . त्यापैकी सविताबाई गुलाबराव हिवर्डे यांना कमिटीच्या दहा सदस्यांपैकी आठ मते मिळवून तर उर्वरित दोन मते नंदू निळे यांना मिळाली. यामध्ये सविताबाई हिवर्डे या अध्यक्षपदी विजयी झाल्या. तर उपाध्यक्षपदी रविंद्र कडुबा चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यासाठी शालेय विद्यार्थी यांचे पालकांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली असल्याचे शाळेच्या मूख्याध्यापिका श्रीमतीबनकर यांनी सांगितले .
फोटोः
१) सविता हिवर्डे-अध्यक्ष
२)कडूबा चव्हाण-उपाध्यक्ष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या