Advertisement

Responsive Advertisement

बौद्धाचार्य परीक्षेत सदानंद देवके उत्तीर्ण

 धर्माबाद -भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर च्या वतीने 27 मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बौद्धाचार्य परीक्षेत धर्माबाद येथील आजवरचे सर्वात कृतिशील ठरलेले भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सदानंद विठ्ठलराव देवके हे उत्तीर्ण झाले आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मातील मानवाच्या जीवनातील जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व विधी कशा पार पाडाव्यात हे ठरवून दिलेले आहेत. त्या विधी पार पाडण्यासाठी प्रशिक्षित बौद्धचार्याची आवश्यकता असते. बौद्ध धम्मातील सर्व संस्कार विधी पार पाडण्यासाठी बौद्धाचार्य असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. यात उत्तीर्ण होणाऱ्या बौद्धचार्याकडून बौद्ध धम्मातील सर्व विधी करवून घेतल्या जातात. 
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर यांनी आयोजित केलेल्या नालंदा बुद्ध विहार, श्रद्धा स्थळ भामघाट नांदेड येथे झालेल्या परीक्षेत धर्माबाद येथील तालुकाध्यक्ष सदानंद देवके हे यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष जी. पी. मिसाळे,  जिल्हा कोषाध्यक्ष सा. ना. भालेराव, माजी तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे सल्लागार जे. के. जोंधळे, भारतीय बौद्ध महासभेचे ता. सचिव गंगाधर धडेकर, भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार तथा पत्रकार संजय कदम, पत्रकार सुदर्शन वाघमारे, समता सैनिक दलाचे कॅप्टन तथा पत्रकार गणेश वाघमारे,माजी सभापती गंगाधर जारीकोटकर, माजी अध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे धर्माबाद पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा बौद्ध महासभेचे पर्यटन सचिव गंगाप्रसाद सोनकांबळे, पत्रकार राजेश सोनकांबळे, मुंबईहून प्रशिक्षित होऊन आलेले सामाजिक कार्यकर्ते राहुल भुतनरे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा धर्माबाद यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या