Advertisement

Responsive Advertisement

शिक्षणमहर्षी स्व. के के जाधव माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल ,ओम संतोष अकोलकर ९३.६० टक्क्यांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण


कन्नड : येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिक्षणमहर्षी स्व.के के जाधव माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या परिक्षेत अखंड यशाची परंपरा कायम ठेवत सलग पाचव्यावर्षी १०० टक्के निकाल प्राप्त केला आहे.
उपळा येथील ओम संतोष अकोलकर ९३.६० टक्क्यांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
सर्व उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळावतीने स्वागत करण्यात आले.
गुणवत्ता यादीत द्वितीय - मगर अनिकेत राजू ९३ टक्के, तृतीय - पवार प्रगती साहेबराव ९१.६० टक्के, तृतीय रोजेकर योगेश मधुकर ९१.६० टक्के तर चतुर्थ - राठोड पायल दिलीप ९१.२० टक्के गुणाने उत्तीर्ण झाले.
शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ताराबाई कृष्णराव जाधव, सचिव सागर कृष्णराव जाधव, प्र.आ सचिन भामरे,  प्र मु प्रदीप भोकन, देवेंद्रसिंग राजपूत, योगेश जंजाळ, सुनील पाटील, दिपक जाधव, ज्ञानेश्वर नायकूडे, लक्ष्मण पांडव, भगवान म्हैसमाळे, रामराव निकम, सोपान गवळी, दत्तात्रय तवटे, सुनीता दापके, सुनीता बाविस्कर, श्रावंती तवटे, मनीषा बारगळ, सुभाष जाधव, संतोष आग्रे यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या