Advertisement

Responsive Advertisement

किमान प्रभारी अधीक्षक म्हणून बिलोलीच्या डॉ.नागेश लखमावाड यांची नियुक्ती करा धर्माबाद वासीयांच्या वतीने मागणी


धर्माबाद- येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद हे चार वर्षापासून रिक्त असून या ठिकाणी आता धर्माबादचे भूमिपुत्र असणारे व बिलोलीच्या वैद्यकीय क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांना उच्चस्तरीय निकष पूर्ण वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून देऊन आपले ग्रामीण रुग्णालय हे बक्षीसपात्र ठरवणारे डॉ.नागेश लखमावाड यांना किमान धर्माबादच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचा प्रभारी पदभार द्यावा अशी रास्त मागणी धर्माबाद वासिंया तर्फे अनेक मान्यवरांनी केली.
काल डॉ.नागेश लखमावाड हे राजाराम काकांनी विद्यालय व कनिष्ठ विद्यालयात एका खाजगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळेस कार्यक्रम संपल्यानंतर स्नेहभोजनाच्या दरम्यान डॉ.नागेश लखमावाड यांना धर्माबाद वासियां तर्फे घेराव घालण्यात आला. व त्यांना धर्माबादला याच असा आग्रह धरण्यात आला. पण हा आग्रह निकषपात्र नसल्यामुळे धर्माबादचे ग्रामीण रुग्णालयाचे सदस्य तथा बाजार समितीचे संचालक रमेश आण्णा गौड, प्रसिद्ध उद्योजक सुबोध सेठ काकाणी मित्रमंडळाचे अध्यक्ष मन्मत आप्पा, नुसरत कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक मोईजोद्दीन बिडीवाले, तद्वतच भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विजय डांगे बाजार समितीचे संचालक दत्ताहरी पाटील आवरे यांनी येत्या दोन दिवसात आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांच्यासह आरोग्यमंत्री व थेट मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन डॉ.नागेश लखमावाड यांना धर्माबादच्या ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक पदाचा किमान प्रभारी पदभार द्यावा अशी रास्त मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या