Advertisement

Responsive Advertisement

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची कार्यकारिणी जाहिर.सिल्लोड, ता.14  : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची सिल्लोड
तालूका कार्यकारिणी मंगळवार (ता.14) रोजी जाहिर करण्यात आली.
अध्यक्षपदी दै.सकाळचे सिल्लोड तालूका बातमीदार सचिन चोबे तर सचिवपदी
दै.दिव्य मराठीचे सिल्लोड तालूका प्रतिनिधी रविंद्र सोनवणे यांची सर्वानुमते
निवड करण्यात आली. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे कार्यकारिणीच्या
निवडीसाठी बैठक घेण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई
संलग्न असलेल्या औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या सिल्लोड तालूका
शाखेच्या निवडीसाठी जेष्ठ पत्रकार मकरंद कोर्डे, प्रा.शिवराम साखळे यांची उपस्थिती
होती. उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष - निलेश सोनटक्के, गजानन जाधव.
सहसचिव - जावेद सौदागर. कोषाध्यक्ष - आजिनाथ बोराडे. सहकोषाध्यक्ष - गजानन
मरकड. निमंत्रक - अनिल साबळे. जिल्हा प्रतिनिधी - राजु वैष्णव. सल्लागार - मकरंद
कोर्डे, प्रा.शिवराम साखळे, प्रकाश वराडे, संजय कुलकर्णी. कार्यकारिणी सदस्यपदी
अनिल कुलकर्णी, सुधाकर सोनवणे, सुभाष होळकर, जितेंद्र जोशी, गोपाल गुंडगे,
कृष्णा सोमासे, अमोल तोंगल, सुनिल बोराडे, सुनिल पांढरे, रितेश गुप्ता, चंद्रकांत
बोराडे, श्रीराम डफळ, राम जोशी, योगेश रोडे, सय्यद एजाज, जफर शेख, दिपक
गुप्ता, जय जैस्वाल, रामेश्वर गरूड, एकनाथ सुलताने, विशाल जाधव, शाम ठाकूर,
दत्ता ढोरमारे, कृष्णा जाधव, गणेश जाधव, अमोल नगरे, राजु बनकर, मयुर जाधव,
अंकूश पवार, दिपक सिरसाट.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या