Advertisement

Responsive Advertisement

भाजपच्या वतीने काटशेवरी फाटा येथे कोरोना योद्धाचा सत्कार सोहळा संपन्न

खुलताबाद- पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी सरकार ने ८ वर्ष पूर्ण केले आहे या निमित्ताने दिनांक ११ जून रोजी काटशेवरी फाटा येथे आ.प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री एल.जी. गायकवाड यांचा पुढाकाराने  कोरोना योद्धांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

राज्यात कोरोनाच्या महामारीच्या संकटात ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घरदार विसरून महाराष्ट्राला अभिप्रेत असलेला खरा महाराष्ट्रधर्म जागवत अविरतपणे कोरोनाशी लढा देत आलेल्या संकटाला न घाबरता त्यांच्याशी ताट मानेने लढण्याची उज्वल परंपरा आणि वारसा राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाई आंबेडकर या व इतर स्रियांनच्या रूपाने महाराष्ट्रला तो लाभला आहे आणि त्यांच्याच विचारावर आणि आदर्शावर पाऊल ठेवत आपण करत असलेलं हे महानकार्य संबंध देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे .काम नव्हे तर कर्तव्य या जाणिवेतून आपणाकडून होत असलेले हे कार्य कोणत्याही व्रतापेक्षा कमी नाही आणि महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही आपल्या सेवारूपी कार्यास सलाम करून जनतेसाठी कोरोना योद्धा म्हणुन महत्वाची भूमिका बजावली म्हणून यामध्ये डॉ संजय चव्हाण व अंगणवाडी कार्यकर्ते , आशावर्कर,
आरोग्य कर्मचारी अशा महिलांचा खुलताबाद तालुक्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन  मा. आ. प्रशांत भाऊ बंब  यांचा हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित  मा.भा.ज.पा.ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजयभाऊ औताडे, जि.प.उपाध्यक्ष एल जी गायकवाड  तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे ,प.स.सभापती गणेश नाना अधाने, ज्ञानेश्र्वर नलावडे, प्रभाकर शिंदे, ज्ञानेश्र्वर बारगळ,प्रकाश चव्हाण, सुरेश जाधव , अजिनाथ जाधव, राजू ठेनगे,विकास कापसे, गणेश झुरावत, सुभाष ठोंबरे, संदीप निकम, राहुल निकुंभ, सत्तर पटेल, ज्ञानेश्वर दांडेकर, रावसाहेब देशमुख, डॉ. शिंदे साहेब, सुनील लहाने,राजू चव्हाण, अरुण चव्हाण, वैजीनाथ अधने, आजिनाथ अधाने, प्रदीप निकम, विजु चांदवदे,सोमीनाथ तुरेवाले, लक्ष्मन अधाणे,मोहन चव्हाण, शिंदे मॅडम, अंगणवाडी सेविका, आशावर्कर,
आरोग्य कर्मचारी पंचक्रोशीतल सर्व भा ज. प. कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या