Advertisement

Responsive Advertisement

संजय कदम यांना सर्वोत्कष्ट वृत्तसंकलन पुरस्कार.


धर्माबाद -तालुक्यातील अभ्यासू व ज्येष्ठ पत्रकार म्हणून ओळखले जाणारे दै. देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी संजय कदम यांना वर्षभरातील सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट वृत्त संकलनाचा पुरस्कार देशोन्नतीच्या वार्षिक मेळाव्यात मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
  कोणाच्या ध्यानी-मनी नसणाऱ्या प्रसंगालाही बातमीत परावर्तित करून मुर्त स्वरूप देणारे,भारदस्त लिखाणशैली व अभ्यासू वृत्ती अंगी जोपासणारे दै.देशोन्नतीच्या माध्यमातून तळागाळात पोहोचलेले व सर्वसामान्य नागरिक,व्यापारी,अधिकारी राजकीय, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्व स्तरात विश्वासार्हता प्राप्त केलेले ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख तालुक्यात आहे. मा.संजय कदम यांना वार्षिक सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट वृत्तसंकलानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून  अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या