Advertisement

Responsive Advertisement

शब्दगंध साहित्य पुरस्काराचे ११जून ला वितरण


(राजेंद्र मराठे) शेवगाव प्रतिनीधी:-  “शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने सन २०१९ व २०२० मध्ये जाहिर केलेले राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार चे वितरण शनिवार  दि.११/०६/२०२२ रोजी दु.१२.३० वा.कोहिनूर मंगल कार्यालय,अहमदनगर येथे जेष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे,”अशी माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली. 
          पुरोगामी विचारांच्या व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असणा-या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.त्यामध्ये कथाकथन, काव्यवाचन,परिसंवाद, चर्चासत्र, कथा-काव्य लेखन स्पर्धा,विविध पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन,बालसंस्कार शिबीर ई उपक्रम राबविण्यात येतात.त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून   “राज्यस्तरीय साहित्य स्पर्धा” आयोजित करण्यात येतात.कोरोना मुळे गेल्या दोन वर्षात साहित्य संमेलन न झाल्याने हे पुरस्कार वितरण बाकी होते.
२०१९ च्या पुरस्कारार्थी मध्ये विळखा - दशरथ चौरे,सुनादी - मांगीलाल राठोड, बुलढाणा, हे बंध रेशमाचे - बबन धुमाळ,दौंड,अबोल अश्रू - प्रा.डॉ.गिरीश खारकर, अमरावती,कृतार्थता - डॉ.अशोक ढगे,नेवासा,जीवन संघर्ष - भानुदास आहेर,सावेडी,उलगडलेल्या नव्या उजेड वाटा - एकनाथ खिल्लारे,औरंगाबाद,कुंकू ते दुनियादारी - प्रा.डॉ.राजेंद्र थोरात,पुणे,विजेता - उमेश घेवरीकर,शेवगांव,काव्यश्रुती – कु.श्रुती गालफाडे,लातूर,आभाळ माया - कु.अस्मिता मराठे, लाडजळगाव  तर २०२० च्या पुरस्कारार्थी मध्ये लॉक डाऊन - ज्ञानेश्वर जाधवर, बार्शी,ऋतूमितवा - तनुजा ढेरे,ठाणे,शेते कापणीसाठी पांढरी झाली - विनोद शिंदे,नगर, रिंगण - सौ.माधुरी मरकड,रातराणी - पोपट वाबळे,बारामती,गावकुसातल्या गोष्टी - डॉ.शिवाजी काळे,श्रीरामपूर,मनात राहणारे - प्रा.शशिकांत शिंदे,कोल्हार,बाप नावाची माय - डॉ.राजेश गायकवाड,परभणी,खानदेश भिल्ल आदिवासी,आंबेडकर चळवळ - सुनीता सावरकर,औरंगाबाद,सतारीच्या तारा - अन्थनी परेरा,वसई,हासरी फुले - डॉ.शुभांगी गादेगावकर,ठाणे,स्वातंत्र्य संग्रामातील सुवर्णरत्ने - रघुराज मेटकरी,विटा     स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल,व बुके असे पुरस्काराचे स्वरूप असून मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.पुरस्कार वितरण समारंभास साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे,डॉ.अशोक कानडे,सुभाष सोनवणे, डॉ.गुंफा कोकाटे,भगवान राऊत,भारत गाडेकर,किशोर डोंगरे,राजेंद्र फंड,कवयित्री शर्मिला गोसावी,राजेंद्र पवार,डॉ.तुकाराम गोंदकर,सुनीलकुमार धस,स्वाती ठुबे,रामकिसन माने,अजयकुमार पवार,बबनराव गिरी व ज्ञानदेव पांडूळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या