Advertisement

Responsive Advertisement

मिटमिटा येथे ई पिकपाहणी अँपचे लोकार्पण,तलाठी आपल्या दारी उपक्रम उत्साहात


औरंगाबाद- पडेगाव ,येथिल मिटमिटा येथे  शेतकऱ्यांना महा राजस्व अभियानाअंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल 1966 कलम 42 ड क ब अंतर्गत नोटिस,सतबारा वाटप करण्यात आले. व ई पीक पाहणी प्रत्यक्षात  प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून देत माहिती देण्यात आली.
यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,अप्पर तहसीलदार विजय चव्हाण, तलाठी ज्ञानेश्वर दगडू सोनवणे मंडळाधिकारी भावसिंग गुसिंगे ,तलाठी एम ए मुळे, ज्ञानेश्वर सोनवणे मिटमिटा गावचे शेतकरी बबन मूळे,दशरथ मूळे,आण्णासहेब वाकळे,दिलीप जाधव,राजेश जाधव,बाबासाहेब वाकळे,डींगबर मूळे ,शिवाजी गायकवाड,गंगाधर चव्हाण,गणपत खडके,असाराम मूळे,राजू आप्पा गूजरे आदिंचीमोठी उपस्थिती होती.
यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. शेतकऱ्यांनी सांगितले की फळबाग साठी अनुदान काय प्रक्रिया आहे व परिसरात सर्वात जास्त प्रमाणात अंजीर,पेरूच्या बागा आहे  फळबागाचे वातावरणामुळे नुकसान होतात त्यासाठी विमा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या