Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद येथे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेधार्थ बंद

दौलताबाद - दौलताबाद येथे आज मुस्लिम समाजाच्या वतीने बंद पाळण्यात आला
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेधार्थ आज मुस्लिम संघटना नी पुकारलेल्या   भारत बंद ला पाठिंबा देत दौलताबाद येथील सर्व   समाज बांधवांनी आपापले दुकाने बंद ठेवुन पाठिंबा देत निषेध नोंदवला आहे. 
मोहम्मद पैगंबर हे मुस्लिम समाजाचे जगाचे श्रद्धास्थान असून त्यांच्या बद्दल कोणतेही अश्या प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्य खपून घेतले जाणार नाही
असे उपस्थित लोकांनी सांगितले
नुपूर शर्मा च्या विरोधात घोषणा देण्यात आली
तर ग्रामस्थांनी नुपूर शर्मा यांनी कथित आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी याचे निवेदन दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांना देण्यात आले
यावेळी सरपंच पवन गायकवाड, माजी उपसरपंच सय्यद शेरू,सय्यद मतीन
सय्यद शफीक,सय्यद जमील,अबू तालिब व ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या