Advertisement

Responsive Advertisement

खासदाराच्या मताला संसदेत किंमत नाही - कॉ. देवव्रत मोहंतीपोस्टमन व एमटीएस संघटनेच्या अधिवेशनाचे थाटात उद्घाटन

औरंगाबाद दि. ५ (प्रतिनिधी)- पोस्टमन व एमटीएस जिवंत रहिला तरच पोस्ट खाते जिवंत राहणार आहे त्यासाठी आपण पोस्ट खासगीकरणाला प्रथम विरोध केला पाहिजे, सध्या केंद्र सरकारमध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांच्या मतांचा विचार केला जातो, बाकी खासदारांच्या मताला संसदेत किंमत दिली जात नाही. त्या दोघांच्या थोपनितीला आपला विरोध आहे, असे मत पोस्टमन व एमटीएस संघटनेचे जनरल सेक्रेटरी डी.बी. मोहंती यांनी व्यक्त केले.
चित्तेपिंपळगाव येथील बागडे पाटील लॉन्समध्ये आयोजित अखिल भारतीय पोस्टमन व एमटीएस संघटनेच्या ३० व्या द्विवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून  संघटनेचे सहायक जनरल सेक्रेटरी बाळकृष्ण चाळके, जनरल सेक्रेटरी प्रदीप खडसे, जनरल सेक्रेटरी सुरेंद्र पालव, सर्वâल सचिव अरविंद शिवतारे, सर्वâल सचिव आर.पी. सारंग, गणेश कदम, अविनाश भुसारी, अमोल शिंदे, वसंतराव देशमुख, एस.बी. टाकळखेडे, महेश सावंत, शिवनाथ बुजाडे, गणपत खेडकर, वल्लभ महेंद्रकर, सुवर्णा ठोंबरे, प्रवर अधीक्षक जी. हरीप्रसाद आदींची उपस्थिती होती. सुरवातीला कॉ. आदीनारायण सभागृह नामलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक करताना आर.पी. सारंग यांनी सांगितले की, पोस्टमन तुटवड्याचा प्रश्न काहीअंशी भरून निघाला आहे. मात्र पोस्टमनवर लादण्यात येणाNया डाकमित्र योजनेला संघटनेचा विरोध आहे. पोस्टमनला देण्यात येणारे टार्गेट ही एकप्रकारे छळवणूक आहे. मात्र संघर्षाशिवाय पोस्टमनच्या जीवनाला मजा नाही असे सांगितले. सूत्रसंचालन देवेंद्र परदेशी, पाराजी जाधव यांनी केले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वश्री देवेंद्र परदेशी, शिवनाथ बुजाडे, पाराजी जाधव, भागवत शिंदे, लक्ष्मीनारायण बजाज, संजय सोनवणे, संदीप तामटे, सय्यद ताज, रुपेश निकम, यकिन शेख, दीपक इंगळे, आनंद बहोत, सुदाम चौरे, वैजिनाथ सहाने, सुनील शिंदे, विष्णू बळप, राजीव ठावूâर, लहू मदन, रवी भोसले व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या