Advertisement

Responsive Advertisement

भांगशी माता गडाजवळ एका विहिरीत महिलेचे शव आढळले

दौलताबाद प्रतिनिधी- 
दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीतील शरणापूर जवळ असलेल्या भांगशी माता गडाजवळ असलेल्या
वंजारवाडी शिवारातिल दत्तमंदिर जवळ ४५/२ गट मध्ये महीलेचा विहीरीत मृतदेह असल्याची माहीती  दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये मिळाली माहिती मिळताच पोलीस सहायक उपनिरीक्षक आर बी राठोड,बी एस पगारे ,बी एस काळे घटनास्थळी धाव घेऊन  सदर महिलेला अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढून मोबाईल टू ने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले 
वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले आहे
महिलेच्या अंगात आकाशी पांढरे रंगाचे वरचे कपडे आहे
या प्रकरणी दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
पुढील तपास पोलीस अंमलदार राजेश पाटील हे करत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या