Advertisement

Responsive Advertisement

उपळा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पुंडलिक राठोड राहुल राठोड यांची व्हाईस चेअरमन पदी निवड


कन्नड : तालुक्यातील उपळा भांबरवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेयरमनपदी पुंडलिक बाबूराव राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेयरमनपदी राहुल प्रल्हाद राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीची घोषणा झाल्यानंतर शाल हार घालून सर्व सदस्यांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी सभासद म्हणून मच्छिंद्र भास्करराव अकोलकर, काकासाहेब वामनराव गोलाईत, सुरेश रामदास बाविस्कर, उखा भावसिंग राठोड, साईदास प्रताप जाधव, मोरसिंग नथ्थू चव्हाण, राजू रूपसिंग चव्हाण, विलास मानसिंग पवार, गणेश लक्ष्मणराव वाघ, शेख शरीफाबी गयासोद्दीन, शारदाबाई बसराज राठोड हे सर्व १३ सभासद उपस्थित होते. यावेळी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी  निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा चव्हाण, आर. डी. राठोड, दादासाहेब अकोलकर आदींनी सहकार्य केले.
या निवडीबद्दल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री संजय राठोड, जिल्हाप्रमुख आमदार आंबादास दानवे, आमदार उदयसिंग राजपूत, माजी आमदार नितीन पाटील, हर्षवर्धन जाधव, नामदेवराव पवार, माजी उप नगराध्यक्ष वाल्मिक लोखंडे, सरपंच नामदेव जाधव, राजेंद्र गोलाईत, उपतालुकाप्रमुख राजू राठोड, अशोक दाबके, विभागप्रमुख सोपान गोलाईत, नवनाथ गोलाईत, पंडित शेगडे, दत्तू लोखंडे, भाऊसाहेब देवरे, भारत गोलाईत, संतोष अकोलकर, दौलत जाधव, दिनेश अकोलकर, भाऊसाहेब अकोलकर आदींनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या