Advertisement

Responsive Advertisement

फतियाबाद येथील शेतात सराई येथिल शेतकरयाची आत्महत्या.


 औरंगाबाद -येथून जवळच असलेल्या  फतियाबाद येथिल गट नंबर १०२ शेतातिल झाडाखाली नग्न अवस्थेत शेतकरी संजय अंबादास पाडळे वय ४७ रा.सराई  यांचा सूलतान नावाचे विष औषधी प्राशन करुन आत्महत्या केलेल्या अवस्थेत मृतदेह सायंकाळी  ५ पोलीसांना वाजता मिळून आला.या घटणेची माहीती दौलताबाद पोलीसांना मिळताच सह.पो.नि. संजय गिते घटणास्थळी आपल्या ताफ्यासह पोहचले व सदर मृतदेह टू मोबाईल व्हँन द्वारे घाटीत हलवण्यात आला.सदर व्यक्ती तिन दिवसापासून घरातून बेपत्ता होते.सदर मृतदेहाजवळ गायछाप पूडी,चूना,रोगट औषधी बाँटल,लासूर येथिल कृषिसेवा केंद्राचे औषधी बील व त्यापाठीमागे संपूर्ण हिशोब देणेघेणे चिठ्टीवर लीहीलेले मिळून आले मृतदेह नेकेड अवस्थेत होता.अशी माहीती सहपोनि गिते यांनी दिली.सदर मृतदेहाजवळ त्याचे कपडे बाजूला काढून ठेवलेले होते ते पोलीनी जप्त केले.सदर शेतकरी याच्यावर कर्ज होते हे प्रथमावस्थेत पोलीसांना दिसून आले.मृत व्यक्तीला दोन अविवाहीत मूले व एक विवाहीत मूलगी असल्याची माहीती नातेवाईकांनी दिली.या प्रकरणी दौलताबाद पोस्टेत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पूढील तपास दौलताबाद पोलीस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या