Advertisement

Responsive Advertisement

अपघातात मृत्यू पावलेल्या वैष्णवी राऊत हिच्या कुटूंबियांचे शिवसेनेकडून सांत्वन ,चंद्रकांत खैरे यांनी दिला राऊत परिवारास धीर


औरंगाबाद: -  ८ जून रोजी वैष्णवी संतोष राऊत या चिमुकलीचा अपघातात मृत्यू झाला. अनिता व संतोष राऊत यांच्या कुटुंबियांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच शिवसेनेतर्फे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अपघातात मृत्यू पावलेल्या राऊत कुटुंबियांची संभाजी कॉलनी येथे एन ६ सिडको भेट घेऊन सांत्वन केले.
 यावेळी शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे,हुशारसिंग चव्हाण, उपशहर प्रमुख अनिल जैस्वाल, विभागप्रमुख सोपान बांगर, शाखाप्रमुख चंद्रकांत देवराज, बद्री ठोंबरे, ऍड. चंद्रकांत गवई, अनिल बर्डे, मधुकर सुरडकर, इरप्पा गादगे,  युवासेना जिल्हा युवाधिकारी मॅचिंद्र देवकर, उपजिल्हा युवाधिकारी गणेश तेलोरे, किरण पाटील, मोतीराम सुरडकर, रमेश चौंडे, महिला आघाडीच्या शहर संघटक विद्या अग्निहोत्री, अंजना गवई, मनीषा बिराजदार, पंचकला काळे आदीसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या