Advertisement

Responsive Advertisement

शिवसेना शाखेच्या वर्धापनदिनाची खडकेश्वर शिवमंदिरात महापूजेने सुरुवात ,गुलमंडी येथेही सत्यनारायण महापूजा


औरंगाबाद : गेल्या ३७ वर्षांपासून अखंड दरवर्षी शिवसेनेच्या वर्धापन दिनाची सुरुवात खडकेश्वर शिवमंदिरात महापूजेने झाली. तसेच गुलमंडी येथेही सत्यनारायण महापूजा करून  शिवसैनिकांत आनंदोत्सव आणि चैतन्य संचारले आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व वैजयंती खैरे यांच्याहस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली.
मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेचा आज ३७ वा वर्धापन दिनाला विशेष महत्त्व झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेऊन हा आनंद द्विगुणित करत आहे. एतेहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभेमुळे शिवसैनिकांत प्रचंड उत्साह संचारला.
या पूजेला शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, महिला आयोगाच्या सदस्य संगीता चव्हाण, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख,  उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, आनंद तांदूळवाडीकर, बाळू गडवे, सचिन खैरे, शिव अंगणवाडी सेनेच्या उपाध्यक्षा रंजना कुलकर्णी, संपर्क संघटक सुनीता आऊलवर, सह संपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा समनव्यक कला ओझा, उपजिल्हा संघटक अंजली मांडवकर, विधानसभा संघटक लक्ष्मी नरहिरे, शहर संघटक प्राजक्ता राजपूत, उपशहर संघटक राज्यश्री राणा, शिवअंगणवाडी सेनेच्या जिल्हा संघटक राखी सुरडकर,अलका कांदे,  रेणुका जोशी, विमल काळे,  गणेश मुळे, बंटी जैस्वाल आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या