Advertisement

Responsive Advertisement

धर्माबादेत राजाराम काकाणी सहकार विद्यामंदिर येथे मूर्ती स्थापना महोत्सव संपन्न..

धर्माबाद-येथील राजाराम काकाणी सहकार विद्यामंदिर येथे दि.4 जून रोजी मूर्ती स्थापना महोत्सव संपन्न झाला आहे. यावेळी बुलढाणा आर्बन चे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, सिएमडी सुकेश झंवर ,नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर ,निर्मल चे जिल्हाधिकारी मुशर्रफ फारुखि, आ.राजेश पवार, माजी आमदार वसंतराव चव्हाण,राजेश  देशमुख कुंटुरकर,कैलाश देशमुख गोरठेकर,गोविंदराव शिंदे नागेलीकर, धर्माबादचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके,तहसीलदार दतात्रय शिंदे यांच्यासह गुरुवर्य,महंत व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
     समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा भाव मनात बाळगून स्व. राजाराम जी काकाणी यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतला आज त्यांच्या तिसऱ्या पिढीकडुन हे कार्य अखंडितपणे सुरू आहे नक्कीच  काकाणी परिवाराची ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकी जोपासना करणे हाच सहकाराचा गाभा आहे.बुलढाणा आर्बन ने हेच धोरण डोळ्यासमोर ठेवून बँकिंग क्षेत्रात पदार्पण केले. आता बँकिंग क्षेत्रासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात एक वेगळा लौकिक आम्ही निर्माण केला असून जनसेवा हीच ईश्वर सेवा आम्ही मानली आहे.आता लवकरच आरोग्य क्षेत्रात पदार्पण करून सर्वसामान्य जनतेला परवडणारी दर्जेदार आरोग्यसेवा सुरू करण्याचा आमचा उद्देश असल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमात बोलताना बुलढाणा आर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजि यांनी व्यक्त केले आहे.1999 ला पहिली सहकार विद्यामंदिर स्थापन करण्यात आले त्यावेळी केवळ 90 विद्यार्थी होते आज राज्यातील 22 विद्यामंदिरात 29 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शिक्षे विना शिक्षण देऊन आम्ही गुणवत्ता व संस्कामय विद्यार्थी घडविण्यासाठी वचनबद्ध आहोत असेही भाईजी म्हणाले.
   देशाची आर्थिक स्थिती बँकेच्या तिजोरीत असली तरी देशाचे उजवल भविष्य शाळेतुनच घडत असते त्यामुळे शिक्षणासोबतच संस्काराला आम्ही प्राधान्य दिले आहे असेही ते म्हणाले.
   सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गणपती ,विद्येची देवी माता सरस्वती ,स्व. राजारामजी काकाणी,यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
  धर्माबाद सारख्या तालुक्याच्या ठिकाणी उद्योजक सूबोध काकाणी यांनी सर्वसुविधायुक्त भव्य शैक्षणिक संकुल उभारणी केली तसेच जागतिक पातळीवर मोठा लौकिक असलेल्या एलन सारख्या नामांकित संस्थेची शाखा सुरुवात केली ही बाब कौतुकास्पद आहे. स्व. राजाराम जी काकाणी यांच्याकडून मिळालेले जनसेवेचे वृत्त व परंपरा त्यांनी चालू ठेऊन ख-या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली.कोरोनाच्या वैश्विक संकटात सेवाभावी वृत्तीने त्यांनी केलेल्या कार्याचा राज्यभर लौकिक निर्माण झाला असून धर्माबादची एकता व आदर्शता त्यातून स्पष्टपणे दिसून आली असे गौरवोद्गार यावेळी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी केले.
 धर्माबादेत शेतकऱ्यांसाठी वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज,व्यवसाकांसाठी बँकेची सुविधा यापूर्वी उपलब्ध करण्यात आली आता विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देणारे सहकार विद्यामंदिर उभारण्यात आले येणाऱ्या काळात गोरगरीब व सर्वसामान्य माणसाला परवडणारे रुग्णालय उभारण्यात येणार असून प्रत्येक उपक्रमात सर्वांचे सहकार्य व साथ लाभली त्यामुळेच हे शक्य झाले सर्वांच्या सहकार्यातुन सुरू असलेले सामाजिक सेवेचे व्रत यापुढे जोपासना करण्याचे अभिवचन यावेळी सौ.राजकुमारी काकाणी व उद्योजक सूबोध काकाणी यांनी बोलून दाखविले आहे.
  कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचे काकाणी परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.
 चौकट.... उद्योजक सूबोध काकाणी यांनी बुलढाणा आर्बन च्या माध्यमातून  यापुर्वी धर्माबादेत तिरुपती बालाजीचा कल्याण महोत्सव, ऐतिहासिक रक्तदान शिबीर, वातानुकूलित कोल्ड स्टोरेज, सीसीटीव्ही कॅमे-यांच्या निगराणीखाली वेअर हौउस तसेच,जनतेसाठी 3रुगवाहिका,अग्निशमन दलाचे वाहन ,इत्यादी कार्यासह कोविडसेंटर ला सलग दोन्ही वर्षी मोफत भोजन असे सामाजिक उपक्रमांनी पार पाडले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या