Advertisement

Responsive Advertisement

पाऊस पडेना, ढेकुळ काय फुटेनापावसाअभावी पेरण्या लांबल्या ...ज्या शेतक-यांनी जुन मध्ये ठींबकाच्या सहा-यावर पेरण्या केल्या त्यांचेवर दुबार पेरणीचे आले संकट ...

सोयगाव / विजय पगारे
परिसरामध्ये पाऊस नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या लांबल्या आहेत. राणाच्या मशागती करून शेतकऱ्यांनी ठेवल्या आहेत. पेरणी करायची म्हटलं तर पाऊस पडायला हवा आहे. परंतु पाऊस लांबल्याने पेरण्या लांबल्या आहेत. विहीरीत तुरळक पाणीसाठा असतांनाच ठींबकाच्या सहा-यावर कांहीं शेतकऱ्यांनी ७ जुन पर्यंत पाऊस पडेल आशेवर  ज्या शेतक-यांनी पेरण्या जुनपुर्व  महिण्यात केल्या त्यांचेवर विहीरींनी तळ गाठलेल्याने  दुबार पेरणीचे संकट आले आहे.


ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. त्या शेतकऱ्यांनी मका,भुईमुग,कांदा व अन्य पाण्यावर येणारी पिके पेरली आहेत. परंतु बाजरी,मुग,मटकी ची पेरणी अद्याप झालेली नाही. अनेक ठिकाणी राणाच्या मशागती झाल्या नाहीत. प्रत्येक शेतकरी पावसाची वाट पाहत आहे.
ज्या शेतकऱ्यांनकडे पाण्याची व्यवस्था नाही.त्या शेतकऱ्यांची बाजरी, मूग, मटकी, उडीद अशी पिके पावसावर येतात परंतु पाऊसच  पडला नसल्यामुळे परिसरातील पेरण्या लामल्या आहेत.


सध्या राज्यात काही भागात अधून मधून रिपरिप पाऊस येत आहे. परंतु सोयगाव तालुक्यात पाऊस नसल्याने जमिनीमध्ये ओलावा नसल्याने पेरणीचं धाडस कोणी करेना. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. त्या शेतकऱ्याने पेरणी केलेली आहे. परंतु जास्तीत जास्त शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.


पाऊस नसल्यामुळे रानाची नांगरटी करून सुद्धा राणे पडून आहेत. मशागत करायची म्हटलं तर रानातील नांगरलेली ढेकळे फुटत नाहीत त्यामुळे मशागत करून तरी काय फायदा ? आज _उद्या पाऊस येईल. पावसाने ढेकळे भिजल्यानंतर ते फुटतील म्हणून शेतकरी पावसाची वाट पाहत आहे.

पाऊस लांबल्याने जमिनीच्या मशागतीची कामे थांबले आहेत. मशागती झाल्याशिवाय पेरणी करायची कशी ?पाऊस पडेना आणि रानातील ढेकुळ काय फुटेना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे
सध्या अधून मधून आकाशात ढग जमा होतांना दिसतात मात्र पावसाची चळक येत नाही.  जमिनीमध्ये ओलावाच  नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या थांबल्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या