Advertisement

Responsive Advertisement

जिल्हा परिषद कन्या शाळेत शाळा पूर्व तयारी - प्रवेशोत्सव मेळावा उत्साहात संपन्न


धर्माबाद:- येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत शाळा पूर्व तयारी प्रवेशोत्सव मेळावा उत्साहात संपन्न झाले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुजाता सोनकांबळे यांच्या हस्ते रिबीन कापून मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण पा. जगदंबे, सदस्या सौ. विद्या निर्वाण वाघमारे, विनोद धुर्वे, इब्राहिम शेख, पत्रकार भगवान कांबळे आणि मुख्याध्यापक एम. एन. कागेरू यांच्यासह पहिल्या वर्गात प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेत माझं पहिलं पाऊल अंतर्गत पहिल्या वर्गात प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाताचे व पायाचे ठसे कागदावर घेण्यात आले. पहिल्या वर्गाच्या वर्गशिक्षिका श्रीमती सुमित्रा बेहरे यांनी उपस्थितांचे नावनोंदणी करून शाळा पूर्व तयारी मेळाव्याबाबत सर्वाना माहिती दिली. विषय शिक्षक नासा येवतीकर, सौ. मनीषा जोशी, सौ. चंदा सय्यद, माधव हिंमगिरे, एजाज सय्यद आदी शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. सदरील मेळाव्यास डाएट नांदेडचे अधिव्याख्याता साखरे साहेब, रत्नाळी केंद्राचे केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवार, गटसाधन केंद्रातील संपर्क विशेष शिक्षक मधुकर बोईनवाड यांनी भेट दिली. नवागत विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेले सेल्फी पॉईंट मेळाव्यात विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या