Advertisement

Responsive Advertisement

उपळा ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारली


औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील उपळा कालीमठ ग्रामपंचायत येथे उपळा ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयात स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारली होती.
महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्रालयाने यापुढे ६ जून शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ रोजी रायगडावर भव्यदिव्य राज्याभिषेक झाला होता. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. आशा या दिनाचे महत्व आणखी वाढविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा झाला.
याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदींच्या हस्ते प्रतिमेस पूजन करण्यात आले. कार्यक्रमास राजेंद्र पाटील गोलाईत, मुकुंदा अकोलकर, प्रकाश जाधव, नवनाथ गोलाईत,भाऊसाहेब देवरे, पंडित शेगडे,  गणेश अकोलकर, विठ्ठल गोलाईत,समाधान गोलाईत, युसूफ शेख आदींसह शिवप्रेमी नागरीक व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या