Advertisement

Responsive Advertisement

शांताराम मगर यांना बाळशास्ञी जांभेकर कार्य गौरव पुरस्कार जाहीर..

वैजापूर-

दिव्य मराठी'च्या औरंगाबाद आवृत्तीतील पत्रकार शांताराम मगर  यांना बाळशास्ञी जांभेकर कार्य गौरव पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला आहे.
योग दिनानिमित्त रविवार दिनांक 19 रोजी कालिदास कलामंदिर शालिमार नाशिक येथे दुपारी 12 वाजता पुरस्कार सोहळा संपन्न होणार आसुसून शांताराम मगर एक अभ्यासू पत्रकार, लेखक व ग्रामीण भागातील शोध पञकारीता निर्भिड पञकार म्हणूनओळखले जातात. त्यांचे  कार्य नव्या पिढीसमोर कायम राहावे या विधायक हेतूने हा पुरस्कार दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर पञकार संघटनेच्या वतीने व अस्तित्व सोशल फाऊंडेशन नाशिक यांच्यावतीने तो दिनाचे औचित्य साधून बाळशास्ञी जांभेकर कार्य गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन कामगार नेते संतोष जाधव योग पंडीत डाॅ पुनम बिरारी.म.रा.बालहक्क संरक्षण आयोगाच्या सायली पालखेडकर.सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा कोठावदे.पर्यटन क्षेत्रातील उद्योजिका शबनम खान सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा कांबळे.कामगार नेते संजय देशमुख देशमुख. सहकार क्षेत्रातील अग्रणी काळे.राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
यंदाच्या पुरस्कारासाठी औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठीचे पञकार शांताराम मगर यांची निवड केल्याची माहिती 
राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी दिली.
शांताराम मगर प्रिंट मीडियातून सातत्याने ग्रामीण विकासाच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विधायक व सुसंस्कृत पत्रकारितेचा वसा व वारसा त्या जोपासत आहेत. तसेच शैक्षणिक,क्रिडा,कला,आध्यात्मिक सांस्कृतिक,शेती,महिला सबलीकरण,राजकीय व ईतर विविध क्षेत्रांतील दैनंदिन घडामोडींवर लक्ष वेधून घेणारी विधायक व विकासात्मक पत्रकारिता हा त्यांच्या आवडीचा विषय आहे.त्यामुळे बाळशास्ञी जांभेकर कार्य गौरव पुरस्कार
  पुरस्कार दिला जाणार आहे.
या सोहळ्यात शांताराम मगर यांना पुरस्कार  प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह,सन्मानपञ  शाल, श्रीफळ असे आहे,कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थामधुन लक ड्राॅ काढण्यात येणार असून भाग्यवान विजेत्यांना कापसे पैठणी येवला यांच्याकडुन पैठणी व ईतर भेटवस्तु प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी दिली.यांनी दिली आहे.
मगर यांचे विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते पञकार आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या