Advertisement

Responsive Advertisement

डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत गुरुकुलची तृप्ती घाटेचे यश


धर्माबाद : ग्रेटर टीचर सायन्स असोसिएशन मुंबई यांच्यातर्फे राबवण्यात येणारे डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा ही एक प्रतिष्ठेची राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा आहे. शैक्षणिक वर्ष21-22 मध्येही ही स्पर्धा राबवण्यात आली होती. या परीक्षेत लेखी ,प्रकल्प व मुलाखत याच तीन स्तरातून निवड करण्यात येते. गुरुकुल विद्यालय धर्माबाद येथील ईयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी घाटे तृप्ती दलितबाबू या विद्यार्थिनीने बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत सिल्वर मेडल प्राप्त करील यश मिळवले आहे.लेखी परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर" व्यायामाने निरोगी आरोग्य लाभते, रोग प्रतिकार शक्ती वाढते" या विषयावर आधारित प्रकल्प लिहून तोंडी परीक्षेसाठी पात्र झाली मुलाखतीद्वारे तिला सिल्वर मेडल साठी निवडण्यात आले. विशेष म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थिती घरची असून तिने मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे .तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रामराव आगलावे सचिव सौ शोभा गोपतवाड मुख्याध्यापक श्री मनमोहन कदम व व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे तिने आपल्या यशाचे श्रेय विद्यालयातील गुरुजनांना व आई-वडिलांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या