Advertisement

Responsive Advertisement

आमदार राजेश पवार यांच्या जनता दरबारात ऑन दी स्पॉट निर्णयामुळे जनता खूषधर्माबाद- आमदार राजेश पवार यांचा आज धर्माबाद मध्ये तहसिलच्या प्रांगणात दुसऱ्यांदा जनता दरबार भरला होता. या जनता दरबारास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळून आमदार राजेश पवार यांच्या ऑन दी स्पॉट निर्णयामुळे जनता अगदी जाम खुश झाली असून बरबटलेल्या कामचुकार कर्मचाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले याचे बोलके चित्र पहावयास मिळाले होते.
  यापूर्वी आमदार राजेश पवार यांनी जिल्हा परिषद येताळा गटासाठी जनता दरबार भरवला होता. तद्नंतर आज करखेली गटासाठी जनता दरबार दुसऱ्यांदा धर्माबाद मध्ये भरवण्यात आला. यामध्ये करखेली गटातील सर्व गावातील नागरिक आपल्या समस्या घेऊन उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने पेंडिंग फेरफार,
सातबारा दुरुस्ती,निराधार श्रावणबाळ,पाणंदरस्ते अतिक्रमणे, वारसा हक्क 7/12,शासकिय प्रमाणपत्रे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वस्त धान्य, म्हणजेच पुरवठा विभाग संबंधी अडचणी,प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अधिक तक्रारी घेऊन लोकं आले होते तरी यामध्ये प्रामुख्याने वीज वितरण कंपनी, महसूल विभागातील तलाठी व स्वस्तधान्य दुकानाच्या संदर्भात तक्रारींचा नुसता पाऊस पडत होता. तर आमदार राजेश पवार यांनी प्रत्येक विभागातील तक्रारी ऐकून संबंधित विभाग प्रमुखांना या संदर्भात बोलते करीत अंतिम निर्णय घेण्याचा आग्रह गीत होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गाची अगदी भंबेरी उडाली होती. पण सर्वसामान्य जनतेची कामे मात्र मार्गी लागत होते. या जनता दरबारात विविध विभागाचे शेकडो प्रकरणे आले व त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यावरच भर दिला गेला.
तद्वतच खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धावपळ चालू असताना खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केल्या जात आहे. त्यासंदर्भात पथकं नेमून त्यांच्यावर कठोर कारवाई करीत संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणीही यावेळी आमदार राजेश पवार यांनी तालुका कृषी अधिकारी तथा जिल्हा कृषी अधिकारी यांना करीत डीएपी खताचा तुटवडा चालला आहे या संदर्भात संदर्भात बफर स्टॉक असतो तो ताबडतोब वितरित करा अशी मागणी केली.
 *चौकट* कुठल्याही विभागातील कामे असो त्या संदर्भात रीतसर कागदपत्रासह पाठपुरावा करून त्या कागदपत्र दाखल केलेल्याची पोचपावती घ्यावी असे आवाहन आमदार राजेश पवार यांनी केले.
*चौकट* प्रशासकीय व्यवस्थेतील अतिशय वादग्रस्त असलेले तलाठी ग्रामसेवक व विविध विभागाचे काही कर्मचाऱ्यांनी आपल्या कारभाराचे बिंग फुटेल या भीतीपोटी जनता दरबारास दांडी मारली असली तरी ते आज का अनुपस्थित आहेत या संदर्भात रीतसर माहिती घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असेही आ.राजेश पवार यांनी यावेळी सांगितले.
सदरील जनता दरबारास तहसीलदार दत्तात्रय शिंदे, गटविकास अधिकारी रामोड, वीज वितरण कंपनीचे अभियंता पांडे, तालुका कृषी अधिकारी पवार, पंचायत कृषी अधिकारी विश्वास आधापुरे, वेगवेगळ्या विभागाचे नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, रजिस्ट्री ऑफिसचे कर्मचारी यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या