Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस तर्फे महानगरपालिका आयुक्तांना विविध विषयावर निवेदने सादर.

औरंगाबाद-
आज दिनांक 28 जून 2022 रोजी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांच्याकडे विविध मागण्याचा निवेदने देण्यात केले. 
ज्यामध्ये प्रमुखाने :- 
1) आरोग्य विषयी चर्चा करण्यात आली, शिष्टमंडळाने महानगरपालिकाच्या आरोग्य केंद्रावरचे डॉक्टरांची रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी केली, ज्याने शहरात आरोग्य व्यवस्था सुधारित व्हावी l तसेच महानगरपालिकेचे आरोग्य केंद्राचे रखरखाव व सुविधा यंत्रणा यावर पण शिष्टमंडळाने आयुक्त याचे ध्यान केंद्रित केले. औरंगाबाद शहरामध्ये वाढलेले पिसाळे कुत्र्यांचे हल्ले व त्याच्या उपचारासाठी लागणारे इंजेक्शन्सची कमतरता पाहता करून तो पण महानगरपालिका आपल्या आरोग्य केंद्रावर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. 
2) महानगरपालिकाचे शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता पाहता नवीन शिक्षकांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी ही मागणी काँग्रेस शिष्टमंडळ मागाणी केली तसेच म.न.पा शाळांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण पण सुरू करावे हे मागणी सुद्धा करण्यात आली l त्याचप्रमाणे महानगरपालिकांनी आपल्याकाही शाळेत बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे त्याला दूर करण्यासाठी महानगरपालिकाची प्रत्येक प्रभागांमध्ये कमीत कमी एक शाळा असावी याची मागणी करण्यात आली. तसेच या अगोदर महानगरपालिका कडून दहावीत मेरिट लिस्ट (90% च्या वर गुणवत्ता) प्राप्त करणारे विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रोत्साहन मानधान मिळत होता जे आता बंद झालेला आहे त्या मानधनाला पुन्हा सुरू करण्याची मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली l तेच तसेच शारीरिक शिक्षणाचे शिक्षक भरती फार दिवसापासून प्रलंबित आहे ते लवकरात लवकर करावी l मनपा कडून 100% अनुदानित शाळांकडून आकारण्यात येणारा कर हा शाळांकडून न आकारता तो कर सरकारकडून आकारण्यात यावा ही मागणी शिष्टमंडळाने केली ज्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला l 
3) तसेच मकाई गेट ते टाऊन हाल व निसर्ग कॉलनी या रस्त्यावर फुटलेले ड्रेनेज लाईन मुळे त्यातून होत असलेले रस्त्याची दुरवस्थेवर पण शिष्टमंडळाने आयुक्तांचे लक्ष वेधले. 
4) फार दिवसापासून रखडलेले ऐतिहासिक पंचक्की येथे मेहमूद दरवाजे चे काम खंडित असल्यामुळे ते लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करण्याची मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली. 
5) तसेच औरंगाबाद शहरामध्ये विविध रस्त्याचे दुरवस्था व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. 
या शिष्टमंडळात औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्यासोबत माजी नगरसेवक तथा घाटी अभ्यासक मंडळाचे सदस्य मोहसिन अहमद व अड. एकबाल सिंगील, औरंगाबाद काँग्रेस अनुसूचित जातीचे शहराध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव संजय वाघमारे व मंसुर मुस्तफा आदी उपस्थित होते l

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या