Advertisement

Responsive Advertisement

जिथून सुरुवात तिथेच सेवानिवृत्ती हे माझे भाग्यच - वनमाला येरावार

     धर्माबाद-
  जिथून माझ्या शिक्षकी सेवेची सुरुवात झाली त्याच मौजे बाळापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माझी सेवानिवृत्ती होणे हे माझे भाग्यच असल्याचे प्रांजळ प्रतिपादन सौ. वनमाला येरावार यांनी केले.
    धर्माबाद तालुक्यातील बाळापुर येथील केंद्रिय प्राथमीक शाळेतील शिक्षीका सौ. वनमाला येरावार ह्या तब्बल ३४ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या असुन या निमित्तीने त्यांच्या निरोप समारंभाचा भव्य असा कार्यक्रम बाळापुर येथील केंद्रिय प्राथमीक शाळेत आयोजीत करण्यात आला होता.
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे सायन्ना जंगीटवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन सखाराम निलावार, अंकुश भोसले, वर्णी नागभुषण, निलेश पाटिल, पांडु पाटील पांगरीकर, श्यामसुंदर झंवर, मनोज बुंदेले, सतिष शिंदे, अ‍ॅड. सुधीर चिंतावर, कमलकिशोर राठी, आनंद शिंदे, साईनाथ डोईजड, मन्मथप्पा रोषणगांवकर, नरेंद्र रेड्डी शाकरलावाड आदि उपस्थीत होते. 
    यावेळी शाळे तर्फे सौ. वनमाला येरावार त्यांचे पती सखाराम मुक्कावार यांच्यासह संपुर्ण कुटुंबियांचा यथोचित सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. अनेक मान्यवरांनी येरावार यांचे तसेच त्यांच्या शिक्षण पध्दतीचे कौतुक केले. ३४ वर्षाच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडविले असुन या काळात त्यांना आपल्या विद्यार्थ्यांच्या पाल्यानाही शिकविण्याचे भाग्य लाभले. माझ्या शिक्षकी सेवेची सुरुवात हि बाळापुर येथील याच शाळेतुन झाली व निरोपहि याच शाळेतुन होत असल्यामुळे माला या बाबत खुप आनंद व अभिमान वाटतो असे भावनात्मक उदगार यावेळी सौ. वनमाला येरावार यांनी काढले. संबंध सहकारी शिक्षक व शिक्षीकांचे व बाळापुर वासीयांचे त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यपक संतोष नाईक यांनी केले तर सुरेख असे सुत्रसंचलन सौ. मिना सुपारे तर उपस्थीतांचे आभार गंगाधर गंगुलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , सौ. ए.पी.चाटे, श्रीमती वाघमारे एस.एस. सौ. मनिषा पाठक, श्रीमती एन.एस. बोडखे, श्रीमती एस.एन. बोईवाड, सौ. विना कोमटवार, सौ. एस.बि. भुरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी बाळापुर केंद्रा अंतर्गत सर्व मुख्याध्यपक, शिक्षक व शिक्षीका मोठ्या प्रमाणात उपस्थीत होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या