Advertisement

Responsive Advertisement

शिवसेना पुन्हा ताकदीने उभी राहील - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
औरंगाबाद: शिवसेना म्हणजेच संघर्ष, त्यामुळे असे संकटं नवीन नाही. या बंडखोरांच्या छातडावर पुन्हा मजबुतीने भगवा फडकविणार असल्याचा निर्धार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.
संभाजीनगर जिल्ह्यातील जनता शिवसेनेला मानणारी व शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी प्रेरित झाली आहे. त्यामुळे हा जिल्हा बालेकिल्ला असून भक्कमपणे पुन्हा उभा राहील.
यावेळी सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या निधी हा उद्धव साहेबांच्या शिफारसिने दिला आहे. मात्र आजारापणामुळे ते समोर आले नाही. याचा गैरफायदा काही लोकांनी घेतला. त्यामुळे निधी हा सामान्य जनतेच्या करातून जमा होतो. त्यांचा फायदा जनतेसाठी करावा, बंडखोरांच्या विकासासाठी नको, असा सल्ला त्यांनी बंडखोरांना दिला.
या पत्रकार परिषदेस शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मराठवाडा सचिव ऍड. अशोक पटवर्धन,   सहसहसंपर्क प्रमुखप्रमुख त्रिम्बक तुपे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपळ कुलकर्णी, ऍड. आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, आनंद तांदूळवाडीकर, अनिल पोलकर, संतोष जेजुरकर, बाप्पा दळवी, अशोक शिंदे, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विजय वाघचौरे, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, माजी सभागृह नेता मकरंद कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रफुल्ल मालानी, सचिन खैरे, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सह संपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, जिल्हा समनव्यक कला ओझा, उपशहरप्रमुख किशोर कच्छवाह, संजय बारवाल, हिरालाल वाणी, राजू खरे, निलेश शिंदे, नितीन धुमाळ, ईश्वर पारखे,  देविदास रत्नपारखे, दिनेश तिवारी, विजय सूर्यवंशी, अनिल मुळे, ज्ञानेश्वर डांगे, रमेश सुपेकर, लक्ष्मण गिऱ्हे, प्रतिक बाफना, इंद्रजित डोणगावकर, महिला उपजिल्हासंघटक अंजली मांडवकर, विधानसभा संघटक लक्ष्मी नरहिरे, मीरा देशपांडे, शहर संघटक अशा दातार, शिव अंगणवाडी सेनेच्या मंजुषा नागरे, राखी सुरडकर, रेणुका जोशी, मीरा बहुरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या