Advertisement

Responsive Advertisement

जगद्गुरू नरेद्राचार्य महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे -रामलूयनगंटिवार


धर्माबाद -अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महराज यांच्या समस्या मार्गदर्शन सोहळ्यासह विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन शुक्रवार व शनिवार दिनांक २४ व २५ जून रोजी श्री क्षेत्र माऊली माहेर मराठवाडा उपपिठ सिमुरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री सांप्रदाय सेवा समीती धर्माबाद चे प्रसिध्दी प्रमुख रामलू यनगंटिवार यांनी दिली आहे. तसेच सदरील सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने धर्माबाद व तेलंगणा सीमेवरील भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
   सदरील कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, हिंदू संग्राम सैनिक,युवा सेना, महिला सेना सर्व तालुकाप्रमुख व सर्व सेवा केंद्र सदस्य ,आरती समितीतील सदस्य मंडळी व भाविक भक्त आदींनी दर्शन व आशीर्वाद घेण्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. संस्थानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रमासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न होणार आहे. व दिनांक २४ व २५ जून रोजी दोन्ही दिवशी कार्यक्रमात परमश्रध्देय जगद्गुरुश्रींचे अमृततुल्य अध्यात्मिक विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. या समस्या व मार्गदर्शन सोहळ्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था मोफत केलेली आहे. तरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा धर्माबाद तालुका व तेलंगणा सीमेवरील पंचक्रोशीतील भक्तगणांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री सांप्रदाय सेवा समितीचे नांदेड उत्तर प्रमुख तथा धर्माबाद तालुक्याचे प्रसिध्दी प्रमुख रामलू यनगंटिवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या