Advertisement

Responsive Advertisement

संभाजीनगरची घोषणा झाली तेव्हा खा. जलील केवढे होते? - चंद्रकांत खैरे

औरंगाबादः चंद्रकांत खैरे  औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणार असल्याचं मी लहानपणापासून ऐकतोय आणि खैरे हे लहान असल्यापासूनच असं बोलतात, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनीही सडेतोड उत्तर दिलंय. ते म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी संभीजानगरच्या नावाची घोषणा केली तेव्हा मी नगरसेवक होतो. 8 मे 1988 ला मी 36 वर्षांचा होतो. साहेबांनी त्यावेळी शहराच्या नावात औरंगजेब कशाला पाहिजे, असं म्हणत नामांतराची घोषणा केली होती. त्यावेळी इम्तियाज जलील होते… हे सांगता खैरे यांनी हातवारे करून दाखवले.. तसेच खा. जलील त्यावेळी राजकारणातदेखील नव्हते, असे स्पष्ट केले.1988 मध्ये संभाजीनगर नावाची घोषणा झाली त्यावेळी इम्तियाज जलील पत्रकार होते. त्यांनी माझ्यावरील अनेक एपिसोड तयार केले होते.  आता राजकारणात आल्यापासून ते आरोप करत आहेत, त्यांना असं बोलण्याची सवयच आहे, असं स्पष्टीकरण चंद्रकांत खैरे यांनी दिलं.औरंगाबादचं संभाजीनगर नाव बदल करण्याची हिंमत शिवसेनेत नाही, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता नाही,. त्याला उत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले, नाव बदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. मात्र त्यांनी मुंबईतल्या सभेत सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सांगितलं म्हणजे औरंगाबादचं नामांतर झालेलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या