Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद अन्न प्रशासनाची विभागाची अभिमानास्पद कामगिरीईट राईट स्पर्धेमध्ये मिळवला देशपातळीवर पुरस्कार

       औरंगाबाद : अन्न व औषध प्रशासन औरंगाबाद विभागाने यावर्षी भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणातर्फे आयोजित ईट राईट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली असून. देशपातळीवर सन्मान मिळवला आहे. या स्पर्धेत अन्न  सुरक्षा व मानके कायद्याच्या अंमलबजावणीचे कामासह ग्राहक जागृती, अन्न व्यावसायिकांचे प्रशिक्षण, ईट राईट कँपस, धार्मिक स्थळांमधील प्रसादाची स्वच्छता व सुरक्षा, पदपथावर विक्री होणाऱ्या अन्न पदार्थाचा दर्जाबाबत हमी इ. निकषावर देशभरातून 75 उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्याची निवड करण्यात आली. त्यामधे मराठवाड्यातील औरंगाबाद व लातूर या जिल्ह्यांनी बाजी मारली आहे. 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित समारोहात मा. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन या जिल्ह्यांचा बहूमान करण्यात आला.
            औरंगाबाद अन्न प्रशासनाचे पथकाने या स्पर्धेमध्ये  सर्व स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. दैनंदिन अंमलबजावणी सह कॅनॉट प्लेस सिडको या ठिकाणाला क्लिन स्ट्रीट फूड हब चा दर्जा मिळाला आहे. पैठण येथील एकनाथ मंदीर अन्न छत्राला स्वच्छ प्रसाद निर्मिती आणि वाटपासाठी भोग प्रमाणपत्र मिळाले आहे. तर जिल्ह्यातील उच्च न्यायालयातील कँटीन, धूत हॉस्पिटल, सिग्मा हॉस्पिटल व अजंता फार्मा कंपनीचे कँटीन यांना ईट राईट कँपस चा दर्जा मिळाला आहे.
            औरंगाबाद जिल्ह्याला हा बहूमान मिळवून देण्यासाठी सहआयुक्त उदय वंजारी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अजित मैत्रे अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कूलकर्णी, सुलक्षणा जाधवर, संजय चट्टे, वर्षा रोडे, मेघना फालके व ज्योत्सना जाधव यांनी कामकाज केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या