Advertisement

Responsive Advertisement

कालीमठ हायस्कूलचा १०० टक्के निकाल ,वैभव काकासाहेब गोलाईत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण


कन्नड : तालुक्यातील कालीमठ उपळा येथील स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूलचा याही वर्षी १०० टक्के निकाल लागला.
एकूण ८२ पैकी ८२ विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले. संस्थेच्या या यशाबद्दल अध्यक्ष शिवाजी सोनवणे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रथम क्रमांकावर वैभव काकासाहेब गोलाईत (८६.८० टक्के), द्वितीय क्रमांक - पायल संजय भवर (८६.६०), तृतीय दीपिका विजय राठोड ( ८६.४०) तर चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे पायल राजू जाधव आणि मयुर त्रंबक राठोड यांनी यश प्राप्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या