Advertisement

Responsive Advertisement

कोंढवड येथील स्वयंसहाय्यता महिला समुहांना प्रोत्साहन पर मदत

राहुरी : कोंढवड येथे गेल्या सहा महिन्यांपुर्वी स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांना गावातील जेष्ठ नागरिकांनी आर्थिक स्वरूपात मदतीचा हात दिला आहे.

कोंढवड येथे महिला स्वयंसहाय्यता समुहांना कर्ज वितरण करण्यासंदर्भात महिलांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सीआरपी राधिका म्हसे, एचडीएफसी बँकेचे अभिजित गर्जे यांनी कर्ज प्रकरणाची विस्तृत माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले. महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या माध्यमातून गावातील महिलांची आर्थिक प्रगती होऊन कुटुंबाला या माध्यमातून हातभार लाभावा, या हेतूने गावातील सामाजिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे दशरथ मोहन म्हसे, क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे व शंकर प्रभाकर औटी यांनी तीन गटांना प्रोत्साहन पर आर्थिक स्वरूपात मदत केली आहे व आपल्या मित्र परिवाराच्या माध्यमातून उर्वरित गटांनाही मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. 

यावेळी जगन्नाथ म्हसे, क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, भाऊ पाले, राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा वैशाली म्हसे, मंगल म्हसे, शोभा म्हसे, जया म्हसे, रूपाली म्हसे, मंगल सुनिल म्हसे, जिजाबाई म्हसे, स्वाती म्हसे, मुक्ताबाई म्हसे, उमा म्हसे, भारती पवार, शितल औटी, मीना म्हसे, स्वाती औटी, अलका म्हसे, उमा पवार आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या