Advertisement

Responsive Advertisement

रत्नाळी केंद्रीय शाळेत पाण्याची व्यवस्था पुन्हा चालू..


धर्माबाद- आमदार राजेश पवार यांच्या प्रयत्नातून धर्माबाद नगरपालिका अंतर्गत असलेल्या रत्नाळी येथील केंद्रीय शाळेत बंद पडलेली पाण्याची व्यवस्था पुन्हा चालू झाली असून शाळेच्या पटांगणाचा वर वाढलेल्या गवताचीही साफसफाई करण्यात आल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आमदार राजेश पवार हे दिनांक 15 जून रोजी धर्माबाद शहराच्या दौऱ्यावर आले होते. शहराचा ड्रोन सर्वे कसा असतो या संदर्भातील तंत्रज्ञान ते समजून घेण्यासाठी आले होते. पण त्यादिवशी शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे सतर्क राहण्यात तरबेज असलेले आमदार म्हणून ख्याती मिळवलेले राजेश पवार यांनी आकस्मिक रत्नाळी केंद्रीय शाळेला भेट दिली. तेव्हा शाळेच्या प्रांगणात गुडघ्या एवढे गवत वाढले होते. शाळेच्या सर्व खोल्यांची व शालेय पोषण आहाराच्या संदर्भात त्यांनी चौकशी केली. तद्वतच पिण्याच्या पाण्याची काय सोय आहे यासंदर्भात विचारले तेव्हा गेल्या वर्षभरापासून त्या शाळेत बोरं होती त्या बोरं मध्ये सबमर्सिबल मोटर बंद अवस्थेत अडकून पडली होती. त्यामुळे पाणी व्यवस्थापन नव्हते. सर्व परिस्थिती पाहता आमदार राजेश पवार हे संबंधित अधिकाऱ्यावर भडकले‌ पहिल्याच दिवशी  साफसफाई अपेक्षित होती व जास्त सुविधा अपेक्षित होत्या त्या नसल्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पण एवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपल्या स्वयं निधीतून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शाळेच्या प्रांगणाची साफसफाई करण्याचे त्यांचे विश्वस्त संचालक रमेश आण्णा गौड यांना सांगितले. त्यांनी तीन दिवस परिश्रम घेऊन सदरील शाळेतील प्रांगणाची साफसफाई सह बोर मध्ये नवीन सबमर्शियल मोटार टाकून दिली. त्यामुळे आज पाणी व्यवस्था सुरळीतपणे चालू झाली.
उपरोक्त पार्श्वभूमीवर शालेय व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक वारले सर व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी आमदार राजेश पवार यांचे आभार मानले .आज सर्व कामे दाखवताना आमदार राजेश पवार यांचे कट्टर समर्थक बाजार समितीचे संचालक रमेश आण्णा गौड, याहिया खान पठाण, पत्रकार गंगाधर धडेकर तद्वतच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या