Advertisement

Responsive Advertisement

कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस; ओढ्यातून जाताना वेगात वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटली.कन्नड - तालुक्यात शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. कुठे कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. नांदगाव तालुक्यातील जातेगाव शिवारात जोरदार पाऊस पडल्याने ओढ्याला आलेल्या पुरात आडगाव ( जे ) येथील महिलेसह दोन मुली वाहून गेल्या. यातील दोघींचे मृतदेह सापडले असुन तिसऱ्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.सुखलाल बहिरव यांच्या जातेगाव शिवारातील शेतात कपाशीची लागवड करण्यासाठी महिला, मुली व पुरुष मिळून ८ जण गेले होते. मात्र ढगफुटी सद्दष्य पाऊस पडल्याने लागवडीचे काम थांबविण्यात आले. त्यानंतर सर्वजण बैलगाडीत बसून घरी परतत होते. ओढ्यातून जाताना वेगात वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटली. पाचजण कसेबसे वाचले मात्र मीना दिलीप बहिरव (५०), साक्षी अनिल सोनवणे ( १६) व पुजा दिनकर सोनवणे ( १२ ) या पुरात वाहून गेल्या. दरम्यान, मीना बहिरव आणि साक्षी सोनवणे या दोघींचे मृतदेह घटनास्थळापासून १ किमीच्या अंतरात सापडले आहे. तर पूजाचा शोध सुरु असल्याची माहिती शिवाजीराव गायकवाड यांनी दिली. गाडी हाकणारा विकास बहिरव ( २८ ) हा जखमी असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची कृउबा समितीचे माजी उपसभापती गणेश शिंदे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या