Advertisement

Responsive Advertisement

ज्ञानेश्वरी महाविद्यालयाचा वर्धापन दिन वृक्ष संवर्धन करून साजरा


फुलंब्री १८ जून – गणोरी येथील ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ट महाविद्यालयाचा वर्धापन दिन श्री क्षेत्र सोनगड येथे संत महंत ह्यांच्या उपस्थिती मध्ये वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला .

संत रामलाल बाबा गेदाई शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ट महाविद्यालय गणोरी दिनांक १८ जून रोजी आपली ४ वर्ष पूर्ण करत आहे. त्या अनुषंगाने पर्यावरण संतुलन आणि संवर्धन करत गणोरी परिसरात शैक्षणिक बीज ज्या पद्धतीने घरा घरात रुजवत आहे. त्याच पद्धतीने पर्यावरण पूरक जबाबदारी देखील प्रत्तेकानी स्वीकारून आपली सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे . म्हणूनच ज्ञानेश्वरी महाविद्यालय आपले ४ वर्ष पूर्ण करत असलेल्या दिवशीच संत रामलाल बाबा गेदाई ह्यांचे निवास्थान असलेले श्री क्षेत्र सोनगड ह्या ठिकाणी विविध प्रकारची वृक्ष लागवड करून अत्यंत सध्या पद्धातीमध्ये साजरी करून कृतीद्वारे संदेश दिला .

ह्यावेळी श्री क्षेत्र सोनगड येथील संत रामलाल बाबा गेन्दाई वारकरी शिक्षण संस्था संचालक – ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज राउत , श्री विलासराव न्यायाधीश ( अध्यक्ष – संत रामलाल बाबा गेन्दाई शिक्षण प्रसारक मंडळ – गणोरी ) वेद शास्त्र संपन्न भागवताचार्य ह भ प श्री किरन भाले ( गुरुजी ) – फुलंब्रीकर श्री शिवाजी अप्पा रोठे , प्रा श्री राजू करडे ( महाविद्यालयीन – गणित प्राध्यापक ) , श्री अभिजित घोडके ( महाविद्यालयीन  – प्राध्यापक ) सौ अमृता घुले , सौ श्वेता जोशी, श्री धनंजय रोठे , तसेच विद्यार्थिनी अश्विनी सपकाळ , शीतल मारकल , आकांक्षा गायकवाड , मोनिका पेहरकर,  किरन गायकवाड , कीर्ती चव्हाण , सपना म्हस्के , कल्याणी चंद्रे , अंजली बोरसे , प्राजक्ता पेहरकर , निकिता जगताप आदी गावकरी व मान्यवर उपस्तीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या