Advertisement

Responsive Advertisement

माणसं जमवण्यासाठी भाजप सारखं नऊवारी घालून इव्हेंट करायची आम्हाला गरज नाही - डॉ नीलम गोऱ्हे


औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमावी म्हणून संभाजीनगरचा विषय समोर आणला जात आहे, अशी टीका भाजपने केली. यावर माणसं जमवण्यासाठी भाजप सारखं नऊवारी घालून आम्हाला इव्हेंट करायची गरज नाही, असा टोला शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी लगावला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २३ मे रोजी औरंगाबादेत भाजपने पाणी प्रश्नावर जलआक्रोश मोर्चा काढला होता. तेव्हा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नऊवारी घालत डोक्यावर हंडे घेत सहभाग नोंदवला होता. यावरून निलम गोऱ्हे यांनी भाजपवर निशाणा साधला. निलम गोऱ्हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीका करतांनाच विविध विषयांवर भूमिका मांडली. पाणी प्रश्नावरून शिवसेनेची कोंडी करणाऱ्या भाजपने केलेल्या टीके विषयी विचारचताच गोऱ्हे म्हणाल्या, औरंगाबाद आणि येथील जनेतेचे शिवसेनेशी वेगळे नाते आहे. या शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेनेने सातत्याने प्रयत्न केले आहे. त्यासाठी कधीही निधीची कमतरता पडू दिली नाही.मलनिस्सारण, रस्ते आणि पाण्यासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. एवढेच नाही तर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मुख्य ठिकाण आणि या लढ्याचे साक्षीदार असलेले शहर म्हणून इथे मराठवाडा मुक्ती संग्रहालय उभारण्यात आले. नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही म्हणून पाणीपट्टी ५० टक्क्याने कमी करत दिलासा दिला. मुबलक पाणी मिळावे यासाठी देखील सरकार, महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.समांतर योजेनेला विरोध केला नसता तर आज पाणीप्रश्न मिटला असता. तेव्हा योजनेला विरोध केला, ती बंद पाडली आणि आता मोर्चा काढतायेत, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या सभेत या सदंर्भात सविस्तर सांगतिलच. संभाजीनगरचा विषय आमच्यासाठी आजचा नाही, तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यावर इतरांना राजकारण करायचे असेल ते करू द्या.केंद्राकडे संभाजीनगरचा प्रस्ताव पाठवलेला असतांना केंद्रीय अर्थराज्यमंत्री म्हणतात प्रस्वाव आला नाही. नामांतराचा विषय हा केंद्राशी निगडीत आहे, तेव्हा डाॅ. कराड यांनी पंतप्रधान मोंदीकडून तो मंजुर करून घ्यावा. सभेला गर्दी जमावी म्हणून या विषयाची चर्चा शिवसेनेकडून केली जात आहे, असा आरोप भाजप करतेय पण आम्हाला माणंस जमवण्यासाठी त्यांच्या सारंख नऊवारी घालून इव्हेंट करण्याची गरज नाही असेही त्या यावेळी म्हणाल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या