Advertisement

Responsive Advertisement

सहा रायडर "सुपर रॅन्डोडनिअर्स"चे मानकरी- जिंतूर रॅन्डोनिअर्सची 600 कि.मी. ब्रेवेट ठरली ऐतिहासिक

ज्ञानेश्वर रोकडे/जिंतूर 
                शहरातील जिंतूर रॅन्डोनिअर्स सायकल क्लबच्या वतीने शनिवार 23 जुलै रोजी जिंतूर-विंचूर-जिंतूर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 600 कि.मी. ब्रेवेटमध्ये अहमदनगर आणि नाशिक येथून आलेल्या 6 रायडरांनी भर पावसात तब्बल दोन दिवस  सायकलिंग करून 600 कि.मी.चा लांब पल्ला यशस्वीपणे गाठून "सुपर रॅन्डोडनिअर्स" मान मिळवला आहे.
               जिंतूर रॅन्डोनिअर्स सायकल क्लबच्या वतीने जिंतूर-जालना-औरंगाबाद-गंगापूर-येवला-विंचूर दरम्यान ब्रेवेट लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये सर्वात लांब पल्ल्याची मानल्या जाणाऱ्या 600 किमी ब्रेवेटचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी चौक येथे देवेंद्र अण्णा भुरे आणि व्यंकटेश भुरे यांनी औरंगाबाद, अहमदनगर आणि नाशिक येथून आलेल्या 8 सायकल स्वारांना झेंडी दाखवली. या लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी सायकल स्वारांना 40 तासांचा निर्धारित वेळ देण्यात आला होता. सायकल स्वारांनी प्रतिकूल वातावरणात तब्बल दोन दिवस सायकलिंग करून निर्धारित वेळेच्या आत 600 किमीचा पल्ला गाठला. औरंगाबाद येथून सहभागी झालेले उन्मेष मारवाडे आणि राहुल बनसोडे यांच्या सायकलमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना मधातच थांबावे लागले पण इतर 6 रायडरांनी अधूनमधून जोरदार पाऊस असत्तांना ही मोठ्या हिमतीने 600 किमीचा लांब पल्ला यशस्वी गाठून "सुपर रॅन्डोडनिअर्स"चा मान मिळवला आहे. वायुदल अधिकारी सर्वेश कुमार, उद्योजक जस्मितसिंग वाधवा, डॉ अनिल कानडे, डॉ मुस्तफा टोपीवाला, रामदास सोनवणे, गणेश कुवर या 6 सायकल स्वारांचा समावेश आहे. याप्रसंगी सहभागी सायकल स्वारांचा क्लबचे सीआर व्यंकटेश भुरे, देवेंद्र भुरे, पवन कालापाड, शेख फुरखान, शेख अलीम, ज्ञानबा मापारी, यज्ञेश मापारी, शहेजाद खान आदींनी पुष्पहाराने गौरव केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या