Advertisement

Responsive Advertisement

सिरजखोड येथे गाव सण उत्साहात साजरा...


धर्माबाद -तालुक्यातील मौजे सिरजखोड मध्ये सर्व नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या हर्षोल्लासात गाव सण साजरा करण्यात आला.
        यानिमित्त गावातील प्रमुख देवी देवतांची पूजा केली जाते. गावावर नेहमी ईश्वराची कृपा राहावी, सुख समृध्दी, आरोग्य नांदावे अशी भावना यामागे असते. गावातील सर्व जाती धर्माचे लोक यानिमित्त एकत्र येतात. डोक्यावर आळंका घेऊन वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने गावातील महालक्ष्मी माता, मरेम्मा माता, पोचम्मा माता, म्हैसम्मा माता, मसई आदी सर्व गावदेवांची नैवेद्य दाखवून,अभिषेक करून, आरती करण्यात येते. व यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.    
    अशाप्रकारे दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी हा सण मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावातील सर्व जाती धर्मातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या