Advertisement

Responsive Advertisement

वाळू माफियाकडून पत्रकारावर हल्ला; पोलिसात गुन्हा दाखल..


सोयगाव/प्रतिनिधी
अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यां ढम्पर चा फोटो व व्हिडीओ शूटिंग केल्याचा संशय घेत   एका दैनिकाच्या पत्रकावर वाळू तस्करी करणाऱ्या माफियाकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पत्रकार हा जखमी झाला असून, सोयगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन मात्र गुन्हेगाराला अटक न केल्याने प्रचंड रोष निर्माण झाला आहे.. ईश्वर गजमल इंगळे असे पत्रकार यांचे नाव असून, अमोल हिरे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

    ईश्वर गजमल इंगळे हे सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वृत्तसंकलन करण्यासाठी गेले असता,  गुंडप्रवृतीचे गौण खनिज वाळू-मुरुम तस्कर इसम अमोल हिरे यांनी अडणुक करीत त्यांना माझ्या ढमंपरचे फोटो आणि व्हिडिओ शुटींग का केली ? असे म्हणत अंगावर धावून अशील शिवीगाळ करीत.  चापट-बुक्क्याने गालावर-छातीवर-पोटात बेदम मुक्का मारदेत पत्रकार माजलेत सरकार आमचेच आहे, तु पत्रकारिता कशी करतो. तुला पुन्हा भेटला तर ढप्परीखाली चिरडून टाकेल म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.काही कळण्याआतच हा प्रकार घडला.  मारहाणीत आडवे पडलेले इंगळे यांनी गुंड हीरेच्या तावडीतून प्रसंग सावध होत, सोयगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली व जीवाला धोका असल्याची तक्रार दिली तक्रारीवरुन सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, दरम्यान फिर्यादी ईश्वर इंगळे यांचेवर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरावरून या घनटेचा निषेध करण्यात येत आहे.

-----आज पत्रकार संघटनेच्या वतीने निदर्शने-----

 वाळू माफियांकडून पत्रकारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सोमवारी ता.१८ तहसील कार्यालयासमोर या घटनेच्या निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी दिली आहे.याबाबत सोमवारी सोयगाव पोलीस ठाणे व उपविभागीय अधिकारी विजय कुमार मराठे यांना प्रतेक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे.

---------पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा----

 पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोयगाव पोलिसांनी दखल पात्र गुन्हा दाखल केला असला तरी याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा,व माकाट असलेला आरोपी अमोल मीरे यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या