Advertisement

Responsive Advertisement

भारतीय राज्य घटनेतील परिच्छेद ५१ वर रविवारी सेमिनारचे आयोजनऔरंगाबाद(प्रतिनिधी)  सेंटर टू प्रमोट हार्मोनी अँड ब्रदरहुड यांचे वतीने भारतीय राज्य घटनेच्या परिच्छेद ५१ (इ) वर एका महत्वपुर्ण सेमिनारचे आयोजन करण्यात आले असुन  सेमिनारचे उदघाटन पुस्तिकेचे प्रकाशन आणि पेपर रिडींग आदी महत्वपुर्ण उपक्रम 
एम जी एम युनिव्हर्सिटी एन ६ येथे दि.३१ जुलै २०२२ रविवार रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ वाजे पर्यंत आईन्स्टाईन सभागृहात संपन्न होणार आहे.या महत्वपुर्ण सेमिनारचे उदघाटन एमजीएम युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ अंकुशराव कदम यांचे हस्ते होणार असुन सेमिनारच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्धी लेखक शेषराव चव्हाण हे राहणार आहे.
या सेमिनार मध्ये अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी संपादीत केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होणार असुन ते 
पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन द्वारे भारतीय राज्य घटनेतील परिच्छेद ५१ (ई) वर सादरीकरण करणार आहे तसेच   माजी न्यायाधीश डी आर शेळके व मानवाधिकार आणि सामाजीक न्याय क्षेत्रातील कवी महोम्मद आयाजोद्दीन व इतर मान्यवर आपले विचार  पेपर सादरीकरण करून व्यक्त करणार असुन दरम्यान उपस्थिता सोबत प्रश्नोत्तरे व चर्चा होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शेषराव चव्हाण हे अध्यक्षीय समारोप करतांना पुढील कृती कार्यक्रम सुद्धा जाहीर करणार आहेत.या महत्वपुर्ण दिशादर्शक सेमिनार साठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
सेंटर टू प्रमोट हार्मोनी अँड ब्रदरहुड यांचे वतीने  करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या