Advertisement

Responsive Advertisement

धानोरा येथे १७० रुग्णांची नेत्र तपासणी४५ रूग्णांवर औरंगाबादेत होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

सिल्लोड -
सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे बालाजी हाॕस्पिटल व  लायन्स क्लब नेत्र रुग्णालय औरंगाबाद यांच्या वतीने आयोजित  मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी १७० रूग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली तर ४५ रूग्णांची औरंगाबाद येथे  मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.
   बालाजी हॉस्पिटलचे व्यवस्थापक  पोपट काकडे हे आठ वर्षापासून धानोरामध्ये  हे शिबिर घेतात.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनीताई काकडे होत्या. यावेळी शशिकांत काकडे व राधाकृष्ण काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रवीण  वाकेकर यांनी केले.  यावेळी माजी आमदार सांडू पाटील लोखंडे,
जि.प.चे माजी उपाध्यक्ष  राजेंद्र जैस्वाल, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे,  ज्ञानेश्वर पाटील मोठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरामध्ये 170 रुग्णांची तपासणी केली असता त्यामध्ये 45 लोकांचे मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया शिबिर हे लायन्स क्लब औरंगाबाद येथे पार पडणार आहे.  यावेळी   सोमनाथ शेठ काकडे, बाळू शेठ काकडे, रवींद्र काकडे, अजिनाथ काकडे, सुखदेव काटकर, संतोष चाबुकस्वार, उत्तम शेठ, दुर्गादास पाटील काकडे, कृष्णा काकडे, बाळू फरकाडे,अंबादास काकडे, भरत काकडे, ज्ञानेश्वर पाटील, गणेश बोराडे, शिवयोग बोराडे,  जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष नारायण काकडे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या